Wednesday, August 20, 2025 09:31:07 AM

पंतप्रधान मोदी ब्रिटन आणि मालदीवला भेट देणार; महत्त्वाच्या करारांवर होणार चर्चा

मालदीवचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइझ्झू यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 25-26 जुलै 2025 दरम्यान मालदीवचा दौरा करतील.

पंतप्रधान मोदी ब्रिटन आणि मालदीवला भेट देणार महत्त्वाच्या करारांवर होणार चर्चा
Prime Minister Narendra Modi
Edited Image

नवी दिल्ली: पंतप्रधान मोदी 23 जुलैपासून दोन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 23-24 जुलै 2025 दरम्यान ब्रिटनच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा चौथा ब्रिटन दौरा असेल. तसेच, त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात, मालदीवचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइझ्झू यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 25-26 जुलै 2025 दरम्यान मालदीवचा दौरा करतील. पंतप्रधान मोदींचा मालदीवचा हा तिसरा दौरा असेल. यासोबतच, डॉ. मोहम्मद मुइझ्झू यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रप्रमुख किंवा सरकारप्रमुखांचा मालदीवचा हा पहिलाच दौरा असेल.

या दौऱ्यात द्विपक्षीय संबंध, जागतिक मुद्दे आणि व्यापार-तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रांवर व्यापक चर्चा अपेक्षित आहे. दौऱ्यादरम्यान, मोदी किंग चार्ल्स तिसरे यांचीही भेट घेणार असून दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापक धोरणात्मक भागीदारी अंतर्गत व्यापार, सुरक्षा, हवामान, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्याचा आढावा घेतला जाणार आहे.

हेही वाचा - अमित शाहांनी चार मंत्र्यांना डच्चू देण्याचे सुचवले त्यात कोकाटेंचं नाव; खासदार राऊतांचा खळबळजनक गौप्यस्फोट

पंतप्रधान मोदी मालदीवला भेट देणार -  

दरम्यान, ब्रिटननंतर मोदी मालदीवच्या दौऱ्यावर रवाना होतील. 25-26 जुलै दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात ते मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइझ्झू यांच्याशी चर्चा करतील. विशेष म्हणजे, 26 जुलै रोजी होणाऱ्या मालदीवच्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्धापन दिनी पंतप्रधान मोदी हे ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

हेही वाचा - उत्तरकाशी हेलिकॉप्टर अपघाताबाबत AAIB जारी केला रिपोर्ट; 'या' कारणामुळे झाला होता अपघात

या दौऱ्यात भारत-मालदीव आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीच्या अंमलबजावणीचा आढावाही घेण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींचा हा मालदीवचा तिसरा आणि ब्रिटनचा चौथा दौरा असणार आहे. या दोन्ही भेटीमुळे भारताचे जागतिक पातळीवरील संबंध अधिक बळकट होण्याची अपेक्षा आहे.
 


सम्बन्धित सामग्री