Monday, September 01, 2025 12:35:03 AM

श्रावणात उंदीर खाल्ल्याबद्दल पश्चात्ताप...? मांजरीने महादेवाच्या फोटोसमोर मागितली माफी, पहा व्हायरल व्हिडिओ

व्हिडिओमध्ये दिसते की मांजर भगवान शिवाच्या प्रतिमेसमोर शांत बसलेली आहे. तिच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप, शांतता आणि भक्तीची झलक स्पष्टपणे दिसत आहे.

श्रावणात उंदीर खाल्ल्याबद्दल पश्चात्ताप मांजरीने महादेवाच्या फोटोसमोर मागितली माफी पहा व्हायरल व्हिडिओ
Video of cat in front of Mahadev's photo
Edited Image

Viral Video of Cat: श्रावण महिना सुरू होताच सोशल मीडियावर विविध व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये कधी कावळे भगवान शंकराच्या चरणी नतमस्तक होतात, तर कधी लोकांना दिव्य दर्शन मिळत असल्याचे दावे केले जातात. अशातच, एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यात एक मांजर भगवान शिवाच्या फोटोसमोर शांतपणे बसलेली दिसत आहे.

मांजरीची भगवान शिवाच्या फोटोसमोर भक्तिभावाने प्रार्थना - 

व्हिडिओमध्ये दिसते की मांजर भगवान शिवाच्या प्रतिमेसमोर शांत बसलेली आहे. तिच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप, शांतता आणि भक्तीची झलक स्पष्टपणे दिसत आहे. @rareindianclips या सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ X वर शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत या व्हिडिओला 21 हजारांहून अधिक व्यूज आणि शेकडो लाईक्स मिळाले आहेत.

हेही वाचा - छत्तीसगडमध्ये दुचाकीला बांधून अजगराला क्रूरपणे ओढले; व्हिडिओ पाहून नेटकरी संतप्त

व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मजेदार प्रतिक्रिया

व्हिडिओवर लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. काहींच्या मते, मांजरीने श्रावण महिन्यात उपवास ठेवला असून ती शिवभक्त बनून भगवान शिवाची पूजा करत आहे. तर काही लोकांनी या व्हिडिओवर विनोदी अंदाजात प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, '900 उंदीर खाल्ल्यानंतर मांजर कावड घेऊन निघाली!' तथापी, दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की, 'भगवान शिवासमोर उंदीर मारल्याबद्दल पश्चात्ताप करणारी मांजर.' 

हेही वाचा - बाप रे!! एक नाही, दोन नाही…थेट 19 साप दिसले एकत्र; व्हिडिओ पाहून व्हाल अवाक्

दरम्यान, काही युजर्सनी या व्हिडिओला आध्यात्मिक शांततेचा अनुभव असेही म्हटले आहे. श्रावण महिन्यात प्राण्यांच्या कृतीदेखील मानवांप्रमाणे श्रद्धा व्यक्त करत असल्याचे दाखवणारे हे दृश्य अनेकांना भावले आहे. हे दृश्य एकतर पशूंच्या नैसर्गिक वागणुकीचे प्रतीक आहे, किंवा श्रद्धाळू मनाने त्यात भक्तिभावाचे दर्शन घडवले आहे.
 


सम्बन्धित सामग्री