Thursday, September 04, 2025 05:22:32 AM

‘एप्रिल मे 99’ चित्रपटातून रोहन मापुस्करांचे दिग्दर्शनात पदार्पण

सध्या चित्रपटसृष्टीत एक नवीन चर्चा सुरू आहे. या नवं वर्षात मापुस्कर ब्रदर्स प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहेत.

‘एप्रिल मे 99’ चित्रपटातून रोहन मापुस्करांचे दिग्दर्शनात पदार्पण

मुंबई : सध्या चित्रपटसृष्टीत एक नवीन चर्चा सुरू आहे. या नवं वर्षात मापुस्कर ब्रदर्स प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहेत. चित्रपटसृष्टीतील अव्वल दर्जाचे दिग्दर्शक व निर्माते राजेश मापुस्कर आणि कास्टिंगच्या दुनियेतलं नावाजलेलं नाव रोहन मापुस्कर हे दोघे एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

राजेश मापुस्कर यांना व्हेंटिलेटर’, ‘फरारी की सवारी’, आणि अलीकडेच प्रदर्शित झालेला येक नंबरसारख्या हिट चित्रपटांसाठी ओळखले जाते. तर रोहन मापुस्कर यांनी प्रख्यात दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्यासोबत लगे रहो मुन्नाभाई3 इडियट्सया चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मापुस्कर ब्रदर्स एप्रिल मे 99हा आगामी चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रोहन मापुस्कर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.

हेही वाचा : नव्या वर्षात 'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपटाची धमाल ट्रीट

तर आता उत्सुकता आहे ती, चित्रपटाची कथा काय असेल? कलाकार कोण असतील? यांसारख्या अनेक गोष्टी अद्याप गुलदस्त्यात असल्या तरी या नवीन वर्षात मापुस्कर ब्रदर्स एकत्र येऊन मोठ्या पडद्यावर धमाका करणार हे नक्की!

 


सम्बन्धित सामग्री