Indian Richest Women: भारतात अशा अनेक महिला आहेत ज्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. या सर्व महिलांपैकी एक म्हणजे रोशनी नाडर. रोशनी नाडर या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहे. रोशनी नाडर ही भारतातील प्रसिद्ध उद्योगपती शिव नाडर यांची कन्या आहे. शिव नाडर हे एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आहेत आणि त्यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे.
रोशनी नाडर करतात HCL टेकच्या व्यवसायाचे व्यवस्थापन -
रोशनी नाडर या एचसीएल टेक्नॉलॉजीजमध्ये वरिष्ठ पदावर आहेत. 2020 मध्ये, शिव नाडर यांनी एचसीएल टेक्नॉलॉजीजमधील अध्यक्षपद सोडले, त्यानंतर त्यांनी हे पद त्यांची मुलगी रोशनी नाडर यांच्याकडे सोपवले. सध्या रोशनी नादर कंपनीच्या अध्यक्षा आणि धोरणात्मक सल्लागार आहेत. रोशनी नाडर अनेक देशांमध्ये पसरलेल्या एचसीएल टेकच्या व्यवसायाचे व्यवस्थापन करतात. एचसीएल टेक ही भारतातील एक आघाडीची सॉफ्टवेअर तंत्रज्ञान कंपनी आहे.
हेही वाचा - वयाच्या 27 व्या वर्षी कमावली एलोन मस्क इतकी संपत्ती; कोण आहे 'ही' अद्भुत व्यक्ती? जाणून घ्या
27 व्या वर्षी बनल्या CEO -
रोशनी नाडर यांनी सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतील वसंत व्हॅली स्कूलमधून घेतले. त्यानंतर त्या पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या. त्यांनी कम्युनिकेशन स्टडीज, रेडिओ, चित्रपट, टीव्हीचा अभ्यास केला आहे, त्यानंतर त्यांनी अनेक चॅनेल्समध्येही काम केले. रोशनी नाडर वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी एचसीएल कॉर्पोरेशनच्या कार्यकारी आणि सीईओ बनल्या.
हेही वाचा - Fuel From Plastic Waste: गुजरातच्या प्राध्यापकाचा अद्भुत पराक्रम! 3 टन कचऱ्यापासून बनवले 1 हजार लिटर इंधन
रोशनी नाडर यांची संपत्ती -
रोशनी नादर यांची एकूण संपत्ती 42 अब्ज डॉलर्स आहे. 2015 मध्ये शिव नाडर यांनी त्यांच्या मुलीला दिल्लीतील फ्रेंड्स कॉलनी ईस्ट भागात 115 कोटी रुपयांचा बंगला घेऊन दिला होता. 2021 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 54 टक्क्यांनी वाढून 84,330 कोटी रुपये झाली.