Shani gochar 2025: ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्त्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफलदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि कुकर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. 29 मार्च 2025 रोजी शनी त्याची स्वराशी कुंभेतून मीन राशीमध्ये प्रवेश केला आहे.
याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो.
आता 29 मार्च 2025 रोजी शनीने त्याच्या स्वराशीतून मीन राशीमध्ये प्रवेश केला आहे. पंचांगानुसार, 17 जानेवारी 2023 रोजी शनीने कुंभ राशीत प्रवेश केला होता. शनीचा स्वराशीतील प्रवेश 12 राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल ठरला. आता मीन राशीत तो साधारण 30 महिने राहणार आहे. याच्या शुभ प्रभावाने 'या' राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळेल.
हेही वाचा - Numerology: या मूलांकांसाठी सोमवार ठरणार लकी! चांगली बातमी मिळेल; पण काही बाबतीत संयम महत्त्वाचा
वृषभ
शनीचे मीन राशीतील गोचर वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी देखील खूप खास असेल. प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. लोकांची साथ मिळेल. जुने चांगले संबंध किंवा बऱ्याच काळापासून चांगले असलेले संबंध उपयोगी पडतील आणि याचा तुमच्या उन्नतीमध्ये लाभ होईल. नव्या ओळखीतूनही फायदा होईल.
मिथुन
मीन राशीतील राशी परिवर्तन मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. कामावर लक्ष केंद्रित करणेही आवश्यक आहे. असे केले तर फायदा होऊ शकतो. चांगले बोलण्यासोबतच कामाचा प्रभाव पडणे आवश्यक आहे.
या राशींचा गोल्डन पिरियड सुरू
शनीच्या साडेसाती आणि धैय्यापासून या तीन राशींची सुटका झाली आहे.
कर्क
शनीचे मीन राशीतील राशी परिवर्तन कर्क राशीच्या व्यक्तींना अत्यंत अनुकूल ठरेल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. ओळखीतील आणि नातेसंबंधातील लोकांशी, मित्र-मैत्रिणींशी चांगले संबंध ठेवा. याच्यामुळे अनेक लाभ होण्यासह मनावरील ताण-तणाव कमी होईल.
हेही वाचा - Numerology: हा मूलांक असलेल्या सूनबाईंचं सासूबाईंबरोबर चांगलं पटतं; खुशामत नाहीत करत कधीच, तरीही जबरदस्त बाँडिंग असतं
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी शनिचे हे भ्रमण भाग्यदायी ठरेल. या राशीच्या लोकांची शनिची साडेसाती 29 मार्चला कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश केल्यामुळे संपली आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक चांगले बदल घडू शकतात. सुमारे 3 वर्षांपासून मकर राशीच्या लोकांना अडचणी आणि त्रास सहन करावे लागत होते, परंतु मीन राशीत प्रवेश होताच शनिदेवाचे आशीर्वाद सुरू होतील. कौटुंबिक आनंदाची कमतरता दूर होईल. येणारा काळ या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. व्यवसायापासून ते नोकरीपर्यंत सर्वांना सकारात्मक बदल दिसतील.
कुंभ रास
कुंभ राशीचा स्वामी शनी आहे आणि 29 मार्च रोजी या राशीच्या साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू झाला. या राशीवरील शनिची ‘साडेसाती’ संपत नाहीये, परंतु त्याचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. व्यवसायात प्रगती होईल. सामाजिक कार्यात रस वाढू शकतो. समाजात आदर वाढू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता राहील. धार्मिक कार्यात रस वाढेल. मन प्रसन्न राहील. व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील. पदोन्नतीची शक्यता असेल ज्यामुळे मन अधिक आनंदी होईल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारू शकतात.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)