Wednesday, August 20, 2025 10:12:44 AM

VIDEO : शिकाऱ्याची शिकार..! शार्कने बेसावध मगरीला पकडलं आणि अख्खी मगरच एका घासात केली फस्त!

काही प्राणी इतके धोकादायक, हिंस्र असतात की, त्यांच्या तावडीत सापडलेल्या प्राणी किंवा माणसाला शेवटच्या घटका मोजायलाही वेळ मिळणार नाही.. अशाच हिंस्र मगरीचा तिच्याहीपेक्षा हिंस्र शार्कसोबत सामना झाला.

video  शिकाऱ्याची शिकार शार्कने बेसावध मगरीला पकडलं आणि अख्खी मगरच एका घासात केली फस्त

Crocodile-Shark Shocking Video Viral : मगरीची ताकद पाण्यात मोठी असते आणि मगरीच्या पकडीला 'मगरमिठी' हे नाव का पडलंय, हे आपल्याला माहीत आहे. अगदी चपळ असलेल्या बिबट्या किंवा चित्त्यालाही मगर आपलं सावज बनवू शकते. पण इतका कसलेला शिकारीही स्वतःच्या आयुष्यात सुरक्षित नाही बरं का.. त्यालाही मागं टाकतील, असे त्याचे शत्रू आहेत. खोल समुद्रात आढळणारा शार्क मासा हाही असाच एक शिकारी.. पण हा मासा किनाऱ्याजवळ फारसा येत नाही. पण कसा कोण जाणे.. समुद्रकिनाऱ्यावर आरामात ऊन खात पडलेल्या मगरीला शार्कने हेरलं.. हा बेसावध क्षण शेवटी मगरीला भारी पडला..

सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक भयानक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी जंगलात शिकार करणाऱ्या सिंहाचे, वाघाचे तर कधी साप, मगरीच्या शिकाराचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे प्राणी इतके धोकादायक आणि हिंस्र असतात की, त्यांच्या तावडीत सापडलेल्या प्राणी किंवा माणसाला शेवटच्या घटका मोजायलाही वेळ मिळणार नाही.. अशाच एका हिंस्र मगरीचा तिच्याहीपेक्षा हिंस्र शार्कसोबत सामना झाला. समुद्रकिनाऱ्यावर बेसावध पडलेल्या मगरीसाठी हा क्षण शेवटचा ठरला.

हेही वाचा - बुडत्या नावेत सेल्फी घेत होत्या तरुणी, नेटिझन्स म्हणाले, 'विमा कंपनी क्लेमही नाही स्वीकारणार!'

एक मगर समुद्राच्या किनाऱ्यावर पाठ टेकवून पोटाचा भाग वरती करून आरामात  पहुडली होती. एक शार्क अलगदपणे तिच्या डोक्याजवळ येतो. इतका वेळपर्यंत मगर हलत नाही. त्यामुळे ती मेलीय किंवा बेशुद्ध झालीय, असा पाहणाऱ्याचा समज होतो. असं वाटत असतानाच शार्क तिच्या डोक्याकडील भाग त्याच्या तोंडात पकडतो.. आणि मगरीला पाण्यात ओढू लागतो. यामुळे मगर सावध होऊन हालचाल करण्याचा पर्यत्न करते. पण शार्कच्या ताकदीसमोर तिला ते जमत नाही. शिवाय, तिला तिचं उलटं असलेलं शरीर सरळही करात येत नाही. अशा पद्धतीने हा शार्क या मगरीला तोंडात ओढून काही क्षणांतच पूर्ण गिळून टाकतो. अशा पद्धतीने बेसावध स्थितीत स्वतः शिकारी असलेल्या मगरीचीच शिकार होताना अनेकदा किंचितसे वाईट वाटू शकते. मृत्यूच्या जबड्यात जाताना इतक्या हिंस्र मगरीची दयनीय अवस्था झाली, हे पाहताना कधीही बेसावध राहणं बरोबर नाही, हेही लक्षात येतं..


 

शार्क माश्याने मगरीच्या केलेल्या शिकारीचा थरारक व्हिडीओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यावर युजर्स आता वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, “शार्कला वाटले असेल की, त्या मगरीची चव चिकनसारखी असेल असे मला वाटते”, दुसऱ्या युजरने लिहिले की, “ती मगर तिथे नक्की काय करत होती”, आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भाऊ झोपताना पकडला गेला.”

हेही वाचा - बैलानं धूम स्टाईलमध्ये चालवली स्कूटर; पहिल्याच 'टेस्ट ड्राईव्ह'चा व्हिडिओ व्हायरल


सम्बन्धित सामग्री