Crocodile Rescue on Bike Video: आपल्यापैकी अनेकांनी मांजर, कुत्रा अशा प्राण्यांना बाईक किंवा चारचाकीतून नेल्याचे पाहिले असेल. लोक अशा प्रवासाचा अनुभव घेणाऱ्या प्राण्यांकडे कौतुकाने पाहत असतात. मात्र, कधी कुणी मगरीला बाईकवर बसवण्याचा पराक्रम केला नसेल!
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ज्या गावांलगत नदी-ओढे, तलाव आहेत, तेथील जलचर अनेकदा पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानंतर पाणवठ्याची हद्द सोडून बाहेर येतात. अशा प्राण्यांमध्ये, मासे, खेकडे, विचू, साप आणि कधी कधी मगरींचाही समावेश असू शकतो.
अशा स्थितीत मगरीसारखा मोठा प्राणी गावात शिरला तर त्याची दहशत लोकांमध्ये निर्माण होते. मगर निघून जाईपर्यंत मगरीकडे आणि पाळीव प्राण्यांकडे, आजूबाजूच्या लोकांकडे विशेषतः लहान मुलांकडे लक्ष ठेवावे लागते.
हेही वाचा - Lover Video Viral : 'रात्री लपतछपत आलो.. फक्त 'तिला' भेटायला..! लग्न करायला थोडाच आलो होतो? असं कुठं असतं होय?'
सध्या अशाच प्रकारे मानवी वस्तीत वाहून आलेल्या एका मगरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात काही तरुण मगरीबरोबर असं काही कृत्य करतात की, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. गावातील हे तरुण मगरीला नदीत सोडण्यासाठी चक्क बाईकवरून घेऊन निघाल्याचे दिसत आहेत. मगरीला लवकरात लवकर पुन्हा नदीत सोडण्याचा निर्णय योग्यच होता. मात्र, यासाठी प्रशिक्षित लोकांची मदत घेणे आवश्यक होते. तेव्हा या तरुणांनी केलेले धाडस धोकादायकच म्हणावे लागेल.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, गावात शिरलेल्या मगरीला काही तरुणांनी आधी दोरीने घट्ट बांधले आहे. यावेळी ती हल्ला करू नये म्हणून तिचे तोंडही दोरीने बांधण्यात आले. त्यानंतर मगरीला बाईकवर ठेवण्यात आले. बाईक चालवणारा एक जण त्यामागे मगर आणि आणखी दोघे जण मागे असे एकूण तिघे जण मगरीला बाईकवर बसवून नदीत सोडण्यासाठी निघाले. अतिशय धोकादायक पद्धतीने मगरीला नेले जात असलेला हा व्हिडिओ आहे.
यावेळी तिथे उपस्थित असलेले लोक त्या तरुणांना सतत मगरीला उलटं करून बसवण्याचा सल्ला देतात. दरम्यान, या व्हिडीओवर आता लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
मगरीच्या सुटकेचा हा व्हिडीओ @SachinGuptaUP नावाच्या अकाउंटवरून पोस्ट केलेला आहे. ‘उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात, पुरात वाहून आलेली एक मगर गावात शिरली. तरुणांनी तिला पकडले. तिचे तोंड बांधून बाईकवर बसवले आणि नदीत सोडले,’ असे याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे,
या व्हिडीओवरती युजर्सनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले- हे खूप धोकादायक लोक आहेत, मगरीलाही प्रश्न पडला असेल की, ती कोणत्या देशात सापडली आहे. दुसऱ्याने म्हटले की, हे फक्त यूपीमध्येच शक्य आहे. तुम्ही यूपीमध्ये राहत असाल. काहींनी मगरीबरोबर असा प्रकार करणं फार चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा - Snake VIDEO : अरे देवा! घरातून 10 फूट लांबीचा नाग बाहेर आला; माणसासारखा उभा राहिला! बघा थरारक व्हिडिओ