Monday, September 01, 2025 01:31:43 AM

Shri Krishna Janmashtami 2025: जन्माष्टमीला जन्मलेल्या मुलांसाठी श्रीकृष्णाची ही सुंदर नावे अर्थासहित

Shri Krishna Inspired Baby Names : तुमच्या मुलाचा जन्म श्री कृष्ण जन्माष्टमीला झाला असेल आणि तुम्हालाही तुमच्या मुलाचे नाव श्री कृष्णाच्या नावावरून ठेवायचे असेल, तर ही सुंदर नावे तुमच्यासाठी..

shri krishna janmashtami 2025 जन्माष्टमीला जन्मलेल्या मुलांसाठी श्रीकृष्णाची ही सुंदर नावे अर्थासहित

Janmashtami 2025 : श्री कृष्ण जन्माष्टमी हा श्रावण महिन्यातील महत्त्वाचा सण आहे. या वर्षी जन्माष्टमी 15 आणि 16 ऑगस्टला तिथीनुसार आली आहे. 16 ऑगस्टला दहीहंडी-गोपालकाला होणार आहे. या दोन्ही दिवशी एखाद्या मुलाचा जन्म तुमच्या घरी झाला असेल, तर ती एक अतिशय शुभ घटना आहे. घरात बाळाचा जन्म संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आणतो. जर श्री कृष्ण जन्माष्टमीच्या आसपास किंवा त्याच दिवशी जन्मलेल्या मुलाचे नाव श्री कृष्णाशी संबंधित ठेवायचे असेल, आम्ही तुम्हाला काही नावे अर्थासहित सुचवत आहोत.

हेही वाचा - Parenting Tips : मुलांचे मन एकाग्र होण्यासाठी या खास टिप्स; बुद्धी होईल तीक्ष्ण

अनिरुद्ध : ज्याला कोणीही रोखू शकत नाही असा...
अद्वैत : जो द्वैताच्या पलीकडे आहे असा. 
अच्युत : ज्याचे कधीही पतन होत नाही असा.. ज्याला कोणीही त्याच्या स्थानावरून खाली खेचू शकत नाही असा..
केशव : भगवान श्री कृष्णाचे हे नाव खूप प्रसिद्ध आहे. 'भौतिकाच्या पलीकडचा' असा या नावाचा अर्थ आहे.
गिरीधर किंवा गिरीधारी : श्री कृष्णाला गिरीधर म्हणतात, म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला गोवर्धन पर्वत उचलणाऱ्या श्री कृष्णाचे नाव देऊ शकता.
कान्हा:  यशोदा मैया देखील भगवान कृष्णाला या नावाने हाक मारत असे. तुम्ही तुमच्या मुलाला हे नाव किंवा टोपणनाव देऊ शकता.
ईशान : तुम्ही तुमच्या मुलाला भगवान कृष्णाचे हे नाव देऊ शकता. श्री कृष्णाचे हे नाव देखील ट्रेंडी आहे.
केयुर : तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या मुलाचे नाव केयुर ठेवू शकता. भगवान श्रीकृष्णाच्या अलंकारांना केयूर म्हणतात. ते एका फुलाचे नाव देखील आहे. तुम्ही तुमच्या मुलाला हे वेगळे नाव देऊ शकता.
निलेश : भगवान श्रीकृष्णाचे हे नाव आहे किंवा निलेश नावाचा अर्थ चंद्र असा आहे. तुम्ही तुमच्या मुलाला हे नाव देऊ शकता.
अनंत : ज्याला अंत नाही असा
अव्यय : ज्याचा कधी व्यय होत नाही असा.. म्हणजेच, जो कधीही संपत नाही असा
चैतन्य : जिवंतपणा किंवा रसरसलेपणा, सकारात्मकता
भानू : हे सूर्याचेही नाव आहे. अत्यंत तेजस्वी..
दामोदर : कृष्णाने लहानपणी खट्याळपणा केल्यानंतर यशोदामाता त्याला दोरीने बांधून ठेवत असे. या बाललीलेवरून कृष्णाला हे नाव मिळाले आहे.
एकनाथ, एकेश्वर, विश्वनाथ : जो एकमेव जगाचा, विश्वाचा नाथ आणि ईश्वर आहे असा..
गौरांग : हे भगवान महाविष्णूचे आणि शिवाचेही नाव आहे.
घनश्याम, मेघश्याम : पावसाळ्यातील ढग किंवा मेघांसारखा ज्याचा सावळा वर्ण आहे असा..
गोपाळ : गायी पाळणारा आणि संपूर्ण गोकुळाचं पालन-पोषण करणारा
गोविंद : गायींनाही आनंद देणारा आणि संपूर्ण गोकुळाला आनंद देणारा
हृषिकेश : ज्याचे सर्व प्रकारच्या संवेदनांवर नियंत्रण आहे असा..
रामकृष्ण : राम आणि कृष्णाचे एकरूपत्व दर्शवणारे हे नाव आहे.
किशन : कृष्णाला बोलीभाषेत किशन म्हटले जाते.
माधव : जो अत्यंत मधुर आहे असा..
मोहन, मनमोहन, जगमोहन, ब्रिजमोहन : मनाला, जगाला, ब्रिजवासियांना आणि सर्वांना मोहिनी घालणारा
मधूसूदन : मधू राक्षसाचा नाश करणारा
नारायण : प्रलयानंतर जे जल सर्वत्र असते, त्याला नार म्हणतात. याच्याही जो पलीकडे आहे, त्याला नारायण म्हणतात.
प्रद्युम्न : जो सर्वशक्तिमान आहे असा..
पुरुषोत्तम : सर्वांत उत्तम गुण आणि लक्षणे असलेला पुरुष
श्यामसुंदर : जो सावळा आणि सुंदर आहे असा..
सुदर्शन : ज्याचे दर्शन अतिशय शुभफलदायक आहे असा. शिवाय, कृष्णाच्या सुदर्शन चक्राचेही हे नाव आहे. 
उपेंद्र : इंद्राचा लहान बंधू
वासुदेव : वसुदेवाचा पुत्र
विश्वेश्वर : संपूर्ण विश्वाचा ईश्वर
विश्वंभर : संपूर्ण विश्वात भरून राहिलेला
विठ्ठल : विष्णूच्या एका अवताराचे हे नाव आहे. वारकऱ्यांचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेला पंढरीचा विठ्ठल हाच तो अवतार..
योगेश्वर : सर्व प्रकारच्या योगांचा ईश्वर
साकेत : भगवान श्रीकृष्णाचे मूळ स्थान
वेणूमाधव, बन्सीधर : ज्याच्या हातात बासरी आहे असा
दयानिधी : जो दया, करुणेचा सागर म्हणजे समुद्र आहे असा
अपराजित : ज्याला कोणीही हरवू शकत नाही असा..
प्रशांत : अत्यंत शांत आणि धीरगंभीर आहे असा..
जनार्दन : जो सर्वांना मदत करतो..
ज्योतिरादित्य : सूर्यासारखा तेजस्वी प्रभा असलेला, सर्वशक्तिमान, अक्षय्य ऊर्जोचा स्रोत
नीरज : ज्याला कमळामध्ये जन्म झाला आहे असा
निरंजन : अत्यंत शुद्ध, पवित्र
राधारमण : राधा ज्याच्यामध्ये समरसून गेली आहे असा
रुक्मिणीश : रुक्मीणीचा ईश म्हणजे ईश्वर
श्रीकांत, लक्ष्मीकांत, लक्ष्मीवल्लभ : श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा पती असा या सर्व नावांचा अर्थ आहे.
जगदीश, जगदीश्वर : संपूर्ण जगाचा ईश म्हणजे ईश्वर आहे असा

हेही वाचा - आईचा राग आवश्यकच; पण छोट्या-छोट्या गोष्टींत अति रागावण्याने चिमुकल्यांना बसतो मोठा धक्का

(Disclaimer - ही बातमी फक्त माहिती देण्यासाठी लिहिली आहे. हे लिहिताना आम्ही सामान्य माहितीची मदत घेतली आहे. जय महाराष्ट्र याचा दावा करत नाही.)


सम्बन्धित सामग्री