Thursday, August 21, 2025 03:39:13 AM

श्री श्री रविशंकर यांच्यामुळे कोलंबियातील आंतरराष्ट्रीय योग दिन उत्सवात साजरा

कोलंबियाच्या बोगोटा शहरातील प्रसिद्ध Plaza La Santa Maria मध्ये योगगुरू श्री श्री रविशंकर यांच्यासोबत 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्सव साजरा करण्यासाठी हजारो लोक एकत्र जमले होते.

श्री श्री रविशंकर यांच्यामुळे कोलंबियातील आंतरराष्ट्रीय योग दिन उत्सवात साजरा

नवी दिल्ली: कोलंबियाच्या बोगोटा शहरातील प्रसिद्ध Plaza La Santa Maria मध्ये योगगुरू श्री श्री रविशंकर यांच्यासोबत 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्सव साजरा करण्यासाठी हजारो लोक एकत्र जमले होते. यंदाच्या वर्षीचा उत्सव विशेष महत्त्वाचा ठरला. कारण तो कोलंबियामध्ये शांततेच्या एका दशकाचे प्रतीक होता. दहा वर्षांपूर्वी, कोलंबियन सरकार आणि FARC (फार्क) गनिमांच्या गटाने एक ऐतिहासिक शांतता करार केला होता, ज्यामुळे अनेक दशकांपासून चालू असलेला सशस्त्र संघर्ष संपुष्टात आला. या शांतता प्रक्रियेत गुरुदेवांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

बोगोटामध्ये योग दिन साजरा करताना गुरुदेवांनी उपस्थितांना सांगितले, “आपण योगाला केवळ शारीरिक व्यायाम समजण्याची चूक करू नये. योग हे आपल्या मन:स्थितीचे प्रतिक आहे”. त्यांनी आपल्या जागतिक कार्यातील एक कमी प्रसिद्ध पैलूही उघड केला. जगभरात वापरला जाणारा Common Yoga Protocol (सामान्य योग प्रोटोकॉल) तयार करणाऱ्या पहिल्या समितीचे नेतृत्व त्यांनी केले होते. “मला खूप आनंद आहे की जगातील किमान एक तृतीयांश लोकसंख्या आता हा प्रोटोकॉल पाळत आहे. पण मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात आपले कार्य इथे संपत नाही, ही तर फक्त सुरुवात आहे”.

या कार्यक्रमाला Observatory of Culture and Cultural Knowledge Management, बोगोटाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालकही उपस्थित होते. त्यांनी म्हटले, “गेल्या काही आठवड्यांमध्ये देशात खूप तणावाचे क्षण आले होते, आणि हा दिवस एक सकारात्मक संदेश देण्यासाठी व भार सुसह्य करण्यासाठी योग्य वेळी आला आहे”.

हेही वाचा: Love Horoscope: प्रेमसंबंधांसाठी आजचा दिवस चांगला राहणार असून तुमचा जोडीदार...

2015 मध्ये गुरुदेवांनी असे काही करून दाखवले, जे अनेकांना अशक्य वाटत होते. जवळपास पन्नास वर्षे FARC बंडखोर आणि कोलंबियन सरकार यांच्यात हिंसक संघर्ष सुरू होता. अशा काळात जेव्हा दोन्ही बाजूंमध्ये अविश्वासाची परिसीमा गाठली होती आणि अनेक शस्त्रसंध्या अयशस्वी झाल्या होत्या, तेव्हा गुरुदेवांनी FARC कमांडर्ससोबत तीन दिवसांची चर्चा केली. त्यांनी त्यांना अहिंसेचा मार्ग स्वीकारण्याची आणि देशाच्या भविष्यासाठी व्यापक दृष्टिकोन बाळगण्याची विनंती केली. त्यांच्या मध्यस्थीमुळे ती कोंडी फुटली. FARC ने एकतर्फी, संपूर्ण वर्षभरासाठी शस्त्रसंधी जाहीर केली. हा एक अभूतपूर्व निर्णय होता, ज्यामुळे त्या वर्षाच्या शेवटी अंतिम कराराची वाट मोकळी झाली.

दहा वर्षांनंतर गुरुदेव पुन्हा कोलंबियात आले, फक्त या मैलाच्या दगडाची नोंद घेण्यासाठी नव्हे, तर अधिक शांततामय आणि ऐक्यपूर्ण दक्षिण अमेरिका घडवण्याचे स्वप्न पुन्हा उजळण्यासाठी. बोगोटा, मेडेलिन आणि कार्टाजेना या शहरांमध्ये त्यांनी संसद सदस्य, उद्योगपती आणि शिक्षणतज्ज्ञांशी संवाद साधला, आणि अनेकांना ध्यानाच्या गहन अनुभूतीची ओळख करून दिली. गुरुदेवांनी कोलंबियन संसदेतही भाषण केले आणि त्यांना प्रेरणा दिली, “एक असे जग, जेथे दु:ख नाही, जेथे अधिक प्रेम, आनंद आणि शांती आहे. हे युटोपियासारखे वाटू शकते. पण माझ्या मते प्रत्येक गोष्ट एका स्वप्नाने सुरू होते. आपण हे स्वप्न पाहायला सुरुवात केली, तर मला खात्री आहे आपण ते पूर्णही करू शकतो”.

20 जून रोजी, गुरुदेवांना Bolívar Governorate Medal ‘Honor to Civil Merit’ या सन्मानाने त्यांची शिस्त, समर्पण आणि समाजघडणीतील अढळ योगदानासाठी गौरविण्यात आले. कार्टाजेना डी इंडियासचे महापौर ड्युमेक टर्बे पाझ यांनीही जागतिक शांतता व आनंद प्रसारात गुरुदेवांच्या मानवी योगदानाची प्रशंसा केली.

लिका गावेइश, एक चित्रपट निर्मात्या आणि छायाचित्रकार, ज्यांनी 2016 मध्ये नवी दिल्लीत झालेल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या World Culture Festival ला हजेरी लावली होती, त्यांनी सांगितले की माजी राष्ट्राध्यक्ष सांतोस यांनी गुरुदेवांच्या शांतता प्रक्रियेमधील भूमिकेबाबत सांगितले. तेव्हा त्या खूप भावूक झाल्या होत्या. “माझा जोडीदार संघर्षग्रस्त भागांमध्ये कॅमेरामन म्हणून काम करत असे, मी पाहिलंय की किती कठीण होतं ते. गुरुदेवांनी त्या भागात शांतता आणण्यासाठी भूमिका बजावली ती मला खूप हृदयस्पर्शी वाटली. संपूर्ण जगाने त्यांचे आभार मानायला हवेत.”


सम्बन्धित सामग्री