Wednesday, August 20, 2025 11:23:22 AM

SIP गुंतवणूक तुम्हाला बनवेल करोडपती! सविस्तर जाणून घ्या, याचं गणित

हल्ली लोकांचा SIP कडे कल झपाट्याने वाढत आहे. याचे कारण म्हणजे यात मिळत असलेले रिटर्न आणि त्यातल्या त्यात कमी धोका. हे दीर्घकाळात सरासरी 12 टक्के रिटर्न देते, जे इतर योजनांमध्ये मिळत नाही.

sip गुंतवणूक तुम्हाला बनवेल करोडपती सविस्तर जाणून घ्या याचं गणित

SIP Investment Tips : SIP दीर्घकाळात सरासरी 12 टक्के रिटर्न देते. इतका परतावा इतर स्किम्समध्ये उपलब्ध नाही. एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे सुरू करण्यासाठी खूप पैशांची आवश्यकता नाही. अगदी 500 रुपयांपासून देखील ही गुंतवणूक सुरू करता येते. एसआयपीमधील गुंतवणूक जसजशी वाढत जाईल, तसतसे याचे फायदे समोर येऊ लागतात. एसआयपीची गुंतवणूक तुम्हाला काही वर्षांत करोडपती बनवू शकते.

हल्ली लोकांचा SIP कडे कल झपाट्याने वाढत आहे. याचे कारण म्हणजे यात मिळत असलेले रिटर्न आणि त्यातल्या त्यात कमी धोका. शिवाय, याचे इतर काही फीचर्स. एसआयपी ही एक शेअर मार्केट लिंक्‍ड स्‍कीम आहे. ज्याद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केली जाते. परंतु बाजाराशी जोडलेले असूनही, शेअर्समध्ये थेट पैसे गुंतवण्याच्या तुलनेत याची जोखीम कमी मानली जाते आणि रिटर्न बराच चांगला मानला जातो. हे दीर्घकाळात सरासरी 12 टक्के रिटर्न देते, जे इतर सरकारी किंवा बँकांच्या योजनांमध्ये उपलब्ध नाही. एसआयपी सुरू करण्यासाठी तुम्हाला खूप पैशांची आवश्यकता नाही. तुम्ही ते फक्त 500 रुपयांपासून सुरू करू शकता. गुंतवणूक केलेली रक्कम जास्त असेल तर, त्यावर मिळणारा नफाही तितका मोठा अपेक्षित असतो.

हेही वाचा - पगार लगेच संपतो आणि महिनाअखेरीस वांदे होतात? हा खास फॉर्म्यूला करून देईल बचत

पण एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन मार्ग आहेत. प्रथम, तुम्ही दरमहा ठराविक रकमेचा हप्ता भरून एक सामान्य एसआयपी चालवू शकता. तर दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही वेळोवेळी तो टॉप-अप करू शकता. यामुळे SIP चा नफा खूप वाढतो. टॉप-अप एसआयपीद्वारे तुम्ही लवकरच स्वतःला करोडपती बनवू शकता. कसे ते इथे जाणून घ्या.

5000 रुपयांच्या SIP चा हिशोब समजून घेऊ

समजा तुम्ही 5000 रुपये प्रति महिना नियमित SIP मध्ये गुंतवणे सुरू केले आणि ही SIP 21 वर्षे चालू ठेवली, तर तुम्ही 21 वर्षांत एकूण 12 लाख 60 हजार रुपयांची गुंतवणूक कराल. या रकमेवर, जर तुम्ही 12 टक्के रिटर्नच्या आधारे गणना केली तर तुम्हाला 39 लाख 55 हजार 34 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे, तुम्हाला 20 वर्षांत एकूण 52 लाख 15 हजार 34 रुपये मिळतील. 

टॉप-अप एसआयपी कसे काम करते?

तुम्ही 5000 रुपयांचा SIP चा हप्ता दर महिन्यासा सुरू केला आणि दरवर्षी  तो 10 टक्के व्याजदराने तो टॉप-अप केला, तर तुम्ही 21 वर्षांत सहजपणे 1 कोटी रुपये मिळवू शकता. टॉप-अप एसआयपी ही एक अशी सुविधा आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या नियमित एसआयपीमध्ये आणखी काही रक्कम जोडू शकता.

उदाहरणार्थ, समजा तुम्ही 5,000 रुपयांचा मासिक एसआयपी सुरू केला, तर एका वर्षानंतर तो 5,000 रुपयांच्या 10 टक्के वाढवा म्हणजे 500 रुपये. आता तुमचा एसआयपी 5,500 रुपये होईल. यामध्ये, पुढच्या वर्षी तुम्हाला 5,500 रुपयांच्या 10 टक्के म्हणजेच 550 रुपये वाढवावे लागतील. या प्रकरणात, तुमचा एसआयपी 6,050 रुपये असेल. त्याचप्रमाणे, तुम्हाला दरवर्षी आधीच्या वर्षी चालू असलेल्या

एसआयपीमध्ये भरत असलेल्या मासिक हप्त्यामध्ये दरवर्षी 10 टक्के रक्कम वाढवावी लागेल
समजा, तुम्ही 5000 रुपयांपासून एसआयपी सुरू केली आणि वार्षिक 10% टॉप-अप भरला तर तुम्ही 21 वर्षांत एकूण 38 लाख 40 हजार 150 रुपये गुंतवाल. परंतु 12 टक्के अंदाजे रिटर्न मिळाल्यास, यावर मिळणारे व्याज 70 लाख 22 हजार 858 असेल. या परिस्थितीत, तुमच्याकडे 21 वर्षांत 1 कोटी 8 लाख 63 हजार 8 रुपये असतील. याचा अर्थ असा की तुम्ही 5,000 रुपयांच्या नियमित SIP मधून जितके पैसे कमवण्याचा विचार करत होता, तितकेच तुम्ही वार्षिक 10 टक्के टॉप-अप करून दुप्पट पैसे कमवू शकता.

हेही वाचा - Buy or Rent House : स्वतःचं घर असावं, ही प्रत्येकाची इच्छा; पण भाड्याने रहावं की खरेदी करावं? काय फायद्याचं?

(Disclaimer : म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री