Monday, September 01, 2025 04:38:02 AM

Uttar Pradesh Shocker: एका महिन्यात 6 वेळा सर्पदंश; तरीही 15 वर्षीय मुलगी मृत्यूच्या दारातून परतली

13 ऑगस्ट रोजी रियाला दुसऱ्यांदा साप चावला. यावेळी तिची प्रकृती खूपच खालावली आणि तिला प्रयागराजमधील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं.

uttar pradesh shocker एका महिन्यात 6 वेळा सर्पदंश तरीही 15 वर्षीय मुलगी मृत्यूच्या दारातून परतली

Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील भैहसाहपूर गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे राहणारी रिया मौर्य नावाची 15 वर्षीय मुलगी गेल्या महिन्यात तब्बल सहा वेळा सापाच्या दंशाची शिकार झाली, तरी प्रत्येक वेळी तिचा जीव चमत्कारिकरित्या वाचला. या दुर्मिळ आणि भीषण घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण आहे. 22 जुलै 2025 रोजी रिया शेतात कामाला गेली असताना तिला पहिल्यांदा सापाने दंश केला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि उपचारांनंतर ती बरी झाली.

तीन दिवसांत 4 वेळा सापाने केला दंश - 

दरम्यान, 13 ऑगस्ट रोजी रियाला दुसऱ्यांदा साप चावला. यावेळी तिची प्रकृती खूपच खालावली आणि तिला प्रयागराजमधील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं. 27 ते 30 ऑगस्ट या अवघ्या तीन दिवसांत तिला आणखी चार वेळा सापाने दंश केला. घरातील कामं, आंघोळ करताना किंवा इतर दैनंदिन कामांत साप अचानक दिसून चावतो, यामुळे गावकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

हेही वाचा - Flesh-eating Screwworm Parasite: धक्कादायक! जिवंत माणसांना खातो 'हा' किडा; मेक्सिकोमध्ये आढळले 5 हजार रुग्ण

सलग हॉस्पिटलायझेशनमुळे कुटुंबाची बचत संपली. हताश होऊन त्यांनी अखेर स्थानिक जादूटोणा करणाऱ्याची मदत घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सिरथू सामुदायिक आरोग्य केंद्राचे अधिकारी अखिलेश सिंह यांनी सांगितले की रियाला तीन वेळा रुग्णालयात आणले गेले होते. तिच्या पायांवर सर्पदंशाचे स्पष्ट खुणा होत्या. तिला नेहमीच प्रतिविष देण्यात आले आणि दोन वेळा प्रगत उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

हेही वाचा - Snake VIDEO : अरे देवा! घरातून 10 फूट लांबीचा नाग बाहेर आला; माणसासारखा उभा राहिला! बघा थरारक व्हिडिओ

गावकऱ्यांची नाराजी - 

स्थानिक रहिवाशांनी वन विभाग व प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र साप पकडण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे गावात भीती आणि रोष वाढला आहे. सध्या रिया आणि तिची भावंडे सुरक्षिततेसाठी आजीच्या घरी हलवण्यात आली आहेत. कुटुंब कायमचे घर सोडण्याचाही विचार करत आहे. ही घटना आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. एकाच व्यक्तीला सलग सहा वेळा सर्पदंश होणे दुर्मिळ असल्याने गावकरी भयभीत आहेत. 


सम्बन्धित सामग्री