मुंबई: मुंबईतील पर्यावरण संरक्षणाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांनी आरोप केला आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि महाराष्ट्र सरकार कुर्ला आयटीआयमध्ये गेल्या वर्षी लावलेल्या 9000 झाडे कोणत्याही परवानगीशिवाय तोडण्याचा विचार करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ही झाडे स्विमिंग पूल बांधण्यासाठी तोडली जाणार आहे, ज्यामुळे पर्यावरण आणि शहरातील नागरिकांसाठी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.
आदित्य ठाकरे यांनी कृष्णात पाटील यांचे ट्विट रिट्विट करून या प्रकरणावर चिंता व्यक्त केली. आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, मंत्री लोढा कुर्ला आयटीआयमध्ये गेल्या वर्षी लावलेल्या 9000 झाडांचे शहरी जंगल तोडण्याचा विचार करत आहेत. यासाठी @HPCL च्या सीएसआर निधीचा वापर करण्यात आला. हे नवीन शहरी जंगल तोडून स्विमिंग पूल बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे, जे निसर्गाविरुद्ध एक मोठे पाऊल असेल. त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री @byadavbjp यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
आदित्य ठाकरे यांची एक्स पोस्ट -
हेही वाचा - सुप्रिया सुळेंनी आणलं आदित्य-अमितला एकत्र
झाडांच्या कत्तलीमुळे पर्यावरण संतुलनावर विपरीत परिणाम -
कृष्णात पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले होते की, गेल्या वर्षी कुर्ला आयटीआयमध्ये नागरी वन म्हणून लावलेली 9000 झाडे आता कोणत्याही परवानगीशिवाय तोडण्याचे नियोजन केले जात आहे. ही झाडे तोडल्याने पर्यावरण संतुलनावर विपरीत परिणाम होईल. पाटील यांनी बीएमसी, मुख्यमंत्री कार्यालय आणि पर्यावरण मंत्रालयाला या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा - ''मुंबईतील मराठी रंगभूमी दालन गुपचूप रद्द का केलं?''; आदित्य ठाकरेंचा सवाल
पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला संताप -
या निर्णयावर पर्यावरणप्रेमी आणि मुंबईतील नागरिक संताप व्यक्त केला आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, या निर्णयामुळे केवळ पर्यावरणाचे नुकसान होणार नाही तर भविष्यातील पिढ्यांसाठीही मोठा धोका ठरू शकतो. शहरी भागात हिरवळ आणि झाडे असणे महत्त्वाचे आहे, कारण ते हवेची गुणवत्ता राखण्यास आणि तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. झाडे तोडल्याने शहरातील हवेतील प्रदूषण वाढेल. आता सरकार आणि संबंधित अधिकारी या प्रकरणात हस्तक्षेप करतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.