Thursday, August 21, 2025 02:30:02 AM

कॅश व्हॅनमध्ये चांदीच्या विटांची थप्पी सापडल्याने खळबळ

विक्रोळीत रविवारी कॅश व्हॅनमध्ये चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ उडाली

कॅश व्हॅनमध्ये चांदीच्या विटांची थप्पी सापडल्याने खळबळ

मुंबई : विक्रोळीत रविवारी कॅश व्हॅनमध्ये चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ उडाली. या घटनेवरून मनसे आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनसमोर गर्दी केली होती. मात्र, चौकशीत चांदीच्या विटांची वाहतूक अधिकृतरित्या करण्यात येत होती, असे समजते. निवडणूक अधिकाऱ्यांसह आयकर विभाग अधिक तपास करत आहे. विक्रोळीत निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एका कॅश व्हॅनवर कारवाई केली. कॅश व्हॅनमध्ये सापडलेल्या चांदीच्या विटांची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. 


सम्बन्धित सामग्री