Japan AI powered Furry Robot : अनेकदा लोक स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि घरात आनंदी वातावरण राखण्यासाठी पाळीव प्राणी पाळतात. काही कुत्रे पाळतात तर काही मांजरी पाळतात, परंतु जपानमध्ये आता लोक एआय रोबोटना त्यांचे पाळीव प्राणी म्हणून पाळत आहेत. ते कुत्रे किंवा मांजरीसारखे दिसतात, आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांचे वर्तन देखील तुमच्या घरातील टॉमी किंवा शेरूसारखे आहे. हे पाहून कोणीही म्हणू शकत नाही की हा पाळीव प्राणी कुत्रा नाही तर, रोबोट आहे. म्हणूनच लोक त्याला तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांना जसे वागवाल, तसे वागवतात.
हा रोबोट खरा अनुभव देतो
येथे आम्ही तुम्हाला ज्या एआय रोबोटबद्दल सांगत आहोत आणि ज्याची सगळीकडे चर्चा केली जात आहे, त्याचे नाव मॉफलिन आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याची शिपिंग सुरू झाली. ते तोंड नसलेल्या पाळीव प्राण्यासारखे दिसते, परंतु त्याच्या अंगावरील फर म्हणजेच केसाळ त्वचा (केसाळ कुत्र्याच्या त्वचेसारखे बाह्य आवरण) अगदी मऊ असते. लोकांना त्याचा खरा कुत्रा असल्यासारखा अनुभव घेता येतो. जेव्हा त्याला मांडीवर घेतले जाते आणि त्याच्यावरून प्रेमाने हात फिरवला जातो, तेव्हा तो अगदी जिवंत प्राण्यासारखे वाटतो.
हेही वाचा - चीनचा आता मानव आणि यंत्रांना 'एकत्र' करण्याचा प्रयत्न; AI शर्यतीत सर्वांत पुढे राहण्याची महत्त्वाकांक्षा
प्रत्येक रोबोटचे गुणधर्म वेगळे आहेत
या एआय रोबोट्समध्ये आता एक आश्चर्यकारक विकास दिसून आला आहे. मॉफलिनमध्ये सुमारे 40 लाख व्यक्तिमत्व गुण दिसून आले आहेत. प्रत्येक मॉफलिनचे गुणधर्म वेगळे आहेत. हे एका उदाहरणाने समजून घ्या, जसे तुमच्या आणि तुमच्या शेजाऱ्याला मॉफलिन आहे. पण तुमचा मॉफलिन वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देईल आणि शेजारी वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देतील. तुमचा मॉफलिन त्या लोकांना ओळखू शकेल ज्यांना तो जास्त आवडतो. तर, शेजाऱ्याचा मॉफलिन त्याच्या जवळच्या लोकांना ओळखू शकेल. विशेष, म्हणजे हा मॉफलिन खऱ्या कुत्र्यासारखा चक्क झोपूही शकतो. त्यांचे झोपेचे चक्र देखील वेगळे आहे. आता तुमचा मॉफलिन फार थोड्या प्रमाणात झोपतो आणि शेजाऱ्यांच्या मॉफलिनमध्ये जास्त झोपाळूपणा आहे. तर, शेजाऱ्यांचा मॉफलिन काय आणि कुठलाही मॉफलिन काय, त्याच्या वैशिष्ट्यांमुळे वेगवेगळा आहे.
7,000 पेक्षा जास्त युनिट्स विकले गेले
कॅसिओने नोव्हेंबर 2024 मध्ये हे एआय रोबोट्स लाँच केले आणि 7,000 पेक्षा जास्त युनिट्स विकले आहेत. कंपनीने म्हटले आहे की, हे रोबोट 30-40 वयोगटातील महिलांमध्ये लोकप्रिय आहेत. मॉफलिन तयार करणाऱ्या टीमच्या प्रमुख एरिना इचिकावा म्हणतात की, लोक सुट्टीच्या काळात मॉफलिनला सहलीवर घेऊन जातात. लोकांना हे देखील कळत आहे की, त्यांचा मॉफलिन इतर मॉफलिनपेक्षा वेगळा आहे.
पाळीव प्राण्यांच्या एआय रोबोट्सची किंमत किती आहे?
जपानच्या या एआय रोबोट्सची किंमत देखील खऱ्या पाळीव प्राण्यांइतकीच आहे. मॉफलिनची किंमत 59,400 येन ($४००) म्हणजे सुमारे 34 ते 35 हजार रुपये आहे. एकदा कंपनीने तुम्हाला हा रोबोट विकला की, ती त्याची सेवा देखील देते. रोबोटची फर धुण्याचे आणि त्याची साफसफाई करण्याचे काम देखील कंपनी स्वतः करते.
हेही वाचा - AI तुमच्या बँक बॅलन्सवर लक्ष ठेवून आहे? आवाजाची नक्कल करून फसवणूक करू शकते, सॅम ऑल्टमन यांचा इशारा