Wednesday, August 20, 2025 10:15:48 PM

EPFO Interest Rate: ईपीएफओच्या व्याजदरात कोणताही बदल नाही, खात्यात जमा पैशांवर किती व्याजदर मिळणार? जाणून घ्या

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2024-25 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदर 8.25 टक्के वर कायम ठेवला आहे.

epfo interest rate ईपीएफओच्या व्याजदरात कोणताही बदल नाही खात्यात जमा पैशांवर किती व्याजदर मिळणार जाणून घ्या
EPFO Interest Rate
Edited Image

EPF Interest Rate: देशभरातील 7.6 कोटी ईपीएफओ सदस्यांसाठी मोठी बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2024-25 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदर 8.25 टक्के वर कायम ठेवला आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2022-23 मध्ये 8.15 टक्के वरून 2023-24 साठी EPF वरील व्याजदर किरकोळ वाढवून 8.25 टक्के केला होता.

2024-25 साठी ईपीएफ व्याजदर 8.25 टक्के कायम - 

ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (सीबीटी) ने शुक्रवारी झालेल्या बैठकीत 2024-25 साठी ईपीएफवर 8.25 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफ ठेवींवर 8.5% व्याजदर सीबीटीने मार्च 2021 मध्ये ठरवला होता. सीबीटीच्या निर्णयानंतर, 2024-25 साठी ईपीएफ ठेवींवरील व्याजदर मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाईल. सरकारच्या मंजुरीनंतर 2024-25 साठी ईपीएफवरील व्याजदर 7 कोटींहून अधिक ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात जमा केला जाईल. अर्थ मंत्रालयामार्फत सरकारच्या मंजुरीनंतरच ईपीएफओ व्याजदर प्रदान करते.

हेही वाचा - 1 मार्चपासून बदलणार आर्थिक नियम! FD, LPG, UPI आणि कर नियोजनावर होणार थेट परिणाम

EPF बॅलन्स कसा तपासायचा? 

ईपीएफओ सदस्य त्यांचे ईपीएफ बॅलन्स तीन प्रकारे तपासू शकतात - उमंग अॅप, ईपीएफओ पोर्टल आणि मिस्ड कॉल.

उमंग अ‍ॅप - 

उमंग अॅपद्वारे ईपीएफ बॅलन्स तपासण्यासाठी, प्रथम उमंग अॅप डाउनलोड करा. तुमच्या फोन नंबरसह नोंदणी करा आणि ईपीएफ पासबुक, क्लेम आणि बॅलन्स चेक सारख्या सेवांचा लाभ घ्या.

ईपीएफओ पोर्टल - 

EPFO पोर्टलद्वारे शिल्लक तपासण्यासाठी, EPFO ​​वेबसाइटला भेट द्या, 'Member Passbook' विभागात जा आणि तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा आणि तुमची EPF शिल्लक तपासा. 

हेही वाचा - होळीपूर्वी महायुती सरकारचे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट! महागाई भत्त्यात 12 टक्के वाढ

मिस्ड कॉल्स - 

याशिवाय, तुम्ही मिस्ड कॉलद्वारे ईपीएफ बॅलन्स तपासू शकतो. यासाठी, तुमच्या यूएएन-नोंदणीकृत मोबाइलवरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्या. 


सम्बन्धित सामग्री