Monday, September 01, 2025 07:15:16 AM

महायुतीच्या 'या' महिला घेणार मंत्रिपदाची शपथ?

नागपूर येथे थोड्याच वेळात आता मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. सर्वांचेच लक्ष मंत्र्यांच्या या शपथविधीकडे लागून आहे.

महायुतीच्या या महिला घेणार मंत्रिपदाची शपथ

महाराष्ट्र: मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यानंतर आता सर्वच जण वाट पाहताय ती म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराची. नागपूर येथे थोड्याच वेळात आता मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. सर्वांचेच लक्ष मंत्र्यांच्या या शपथविधीकडे लागून आहे. त्यातच आता महायुती सरकारमधील कोणत्या लाडक्या बहिणी शपथ घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

भाजपाकडून कोणत्या लाडक्या बहिणीला संधी? 
भाजपाकडून यंदा तीन तीन महिलांना संधी देण्यात आली आहे. यात पंकजा मुंडे, मेघना बर्डीकर आणि माधुरी मिसळ यांना संधी देण्यात आली आहे. 

पंकजा मुंडे यांची राजकीय कारकीर्द 
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या आहेत
बीड जिल्ह्यातील प्रमुख राजकीय चेहरा अशी त्यांची ओळख आहे
2009 मध्ये गोपीनाथ मुंडे लोकसभेवर गेल्यानंतर परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पहिल्यांदा विधानसभेत पोहचल्या 
फडणवीस सरकार 2014 मध्ये कॅबिनेट मंत्रीपद
2015 मध्ये पंकजा मुंडे यांच्यावर 206 कोटींच्या चिक्की घोटाळ्याचे गंभीर आरोप
विधानपरिषदेत भाजपाच्या आमदार
2019 ते 2024 पर्यंत राष्ट्रीय पातळीवरच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या

शिवसेनेकडून कोणत्या लाडक्या बहिणीला संधी? 
शिवसेनेकडून यंदा एकही लाडक्या बहिणीला संधी देण्यात आलेली नाही. 

राष्ट्रवादीकडून कोणत्या बहिणीला संधी? 
राष्ट्रवादीकडून यंदा अदिती तटकरे यांना संधी देण्यात आली आहे. मागील मंत्री मंडळात सुद्धा त्यांची वर्णी लागली होती. त्यांच्याकडे महत्त्वाचं खातं होतं. तर या मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. 

अदिती तटकरे यांची राजकीय कारकीर्द? 
आदिती सुनील तटकरे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील रोहा या गावी झाला
2017 - 2019  रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद
2019 साली श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व 
ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्रीपदाची जबाबदारी
शिंदे सरकारमध्ये महिला आणि बाल विकास कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी 
2012 साली राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कोकण विभाग संघटकपदाची जबाबदारी


सम्बन्धित सामग्री