Sunday, August 31, 2025 02:51:08 PM

Bengaluru Cab Driver Rules for Passengers: OYO समजू नका! कॅब ड्रायव्हरने जोडप्यांसाठी बनवले कठोर नियम सोशल मीडियावर व्हायरल

कॅब ड्रायव्हरने त्याच्या गाडीच्या सीटवर जोडप्यांसाठी जे नियम लिहिले आहेत ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल पोस्टमध्ये कॅबच्या ड्रायव्हरच्या सीटवर एक कागद अडकलेला दिसतो.

bengaluru cab driver rules for passengers oyo समजू नका कॅब ड्रायव्हरने जोडप्यांसाठी बनवले कठोर नियम सोशल मीडियावर व्हायरल
Bengaluru Cab Driver Rules for Passengers
Edited Image

Bengaluru Cab Driver Rules for Passengers: बऱ्याचदा लोक त्यांच्या वासनेत इतके आंधळे होतात की त्यांना सार्वजनिक ठिकाणांचीही पर्वा नसते. अनेक जोडप सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह कृत्ये करताना दिसतात. अनेकदा कॅब किंवा मेट्रोमध्ये अशा घटना पाहायला मिळतात. लोकांच्या या कृतींमुळे इतर लोकही अस्वस्थ होतात. जर कोणी असे कृत्य करत असेल तर इतरांना त्यामुळे अस्वस्थत वाटू लागते. अशा परिस्थितीत काय करावे हे कोणालाही कळत नाही. मजबुरीमुळे त्यांना हे सर्व सहन करावे लागते. तथापि, लोकांच्या या कृतींबद्दल वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे विचार असू शकतात. पण बेंगळुरूच्या एका कॅब ड्रायव्हरने या विषयावर उघडपणे आपले मत व्यक्त केले आणि त्याच्या कॅबमध्ये बसणाऱ्या जोडप्यांसाठी त्याने एक इशारा जारी केला. 

कॅब ड्रायव्हरने जोडप्यांसाठी बनवले नियम - 

कॅब ड्रायव्हरने त्याच्या गाडीच्या सीटवर जोडप्यांसाठी जे नियम लिहिले आहेत ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल पोस्टमध्ये कॅबच्या ड्रायव्हरच्या सीटवर एक कागद अडकलेला दिसतो. ज्यामध्ये लिहिले आहे - 'सावधान, प्रेमसंबंध करू नका. ही कॅब आहे. तुमची खाजगी जागा किंवा ओयो हॉटेल नाही, म्हणून अंतर ठेवा आणि संयम ठेवा.' 

हेही वाचा - आधी त्याने मोटारसायकल चोरली; 450 किमी प्रवास केला आणि असे काही केले की, बाईक मालकालाही धक्का बसला!

कॅब ड्रायव्हरने बनवलेले नियम सोशल मीडियावर व्हायरल -  

कॅब ड्रायव्हरने हा इशारा एका कागदावर लिहून त्याच्या सीटच्या मागे चिकटवला आहे. जेणेकरून मागे बसलेल्या लोकांना तो कागद पाहता येईल आणि ते कॅबमध्ये कोणतेही अश्लील कृत्य करणार नाहीत. कॅब ड्रायव्हरची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. कॅब ड्रायव्हरने दिलेला हा इशारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर @r/indiasocial नावाच्या ग्रुपमध्ये शेअर करण्यात आला. ड्रायव्हरच्या या इशाऱ्यावर लोक विविध टिप्पण्या देऊन आपले मत मांडत आहेत. 

हेही वाचा - World's Most Expensive Pet Dog: काय सांगता! 50 कोटी रुपयांचा कुत्रा..!! बेंगळुरूच्या एस सतीशने खरेदी केला जगातील सर्वात महागडा 'वुल्फडॉग'

बेंगळुरू हे एक आयटी हब आहे. जिथे जगभरातून लोक काम करण्यासाठी येतात. मोठे शहर असल्याने, येथील लोक खूप मोकळ्या पद्धतीने जगण्याचा विचार करतात. परंतु, कधीकधी लोक त्यांच्या सर्व मर्यादा ओलांडतात आणि सार्वजनिक ठिकाणी उघडपणे आक्षेपार्ह कृत्ये करू लागतात. अशा लोकांसाठी या कॅब ड्रायव्हरने हा खास इशारा जारी केला असून सध्या तो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होतोय. 
 


सम्बन्धित सामग्री