Monday, September 01, 2025 02:54:59 AM

दिल्लीतील महिलांसाठी खूशखबर! महिला समृद्धी योजनेअंतर्गत 'या' तारखेपर्यंत मिळणार 2500 रुपये

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आश्वासन दिले की, भाजप सरकार महिलांना दरमहा 2500 रुपये आर्थिक मदत देण्याचे त्यांचे निवडणूक वचन पूर्ण करेल.

दिल्लीतील महिलांसाठी खूशखबर महिला समृद्धी योजनेअंतर्गत या तारखेपर्यंत मिळणार 2500 रुपये
Mahila Samriddhi Yojana First Installment
Edited Image

Mahila Samriddhi Yojana First Installment: आज दिल्लीत तब्बल 26 वर्षांनी भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने निवडणूक आश्वासनात महिलांना महिला समृद्धी योजनेअंतर्गत दरमहा 2500 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. आता या योजनेच्या लाभार्थी महिला पैशाची वाट पाहत आहेत. दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आश्वासन दिले की, भाजप सरकार महिलांना दरमहा 2500 रुपये आर्थिक मदत देण्याचे त्यांचे निवडणूक वचन पूर्ण करेल. मासिक मदतीचा पहिला हप्ता पात्र महिलांच्या खात्यात 8 मार्चपर्यंत जमा केला जाईल.

हेही वाचा - रेखा गुप्ता यांचा 'शीशमहाल'मध्ये राहण्यास नकार; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचे करणार संग्रहालयात रूपांतर

महिला समृद्धी योजनेच्या लाभार्थी महिलांना मिळणार दरमहा 2500 रुपये - 

आम आदमी पक्षाने (आप) सत्तेत आल्यास महिलांना दरमहा 2100 रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. त्याच वेळी, भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात दरमहा 2500 रुपये मदत देण्याचे आश्वासन दिले होते. बुधवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झालेल्या रेखा गुप्ता यांनी आश्वासने पूर्ण करणे ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगितले.

हेही वाचा - Rekha Gupta New CM of New Delhi : रेखा गुप्ता मुख्यमंत्री बनल्यामुळे केजरीवालांना काय नुकसान होणार? काय आहे भाजपची खेळी?

भाजपने दिल्लीच्या जनतेला कोणती आश्वासनं दिली होती?

  • महिलांना दरमहा 2500 रुपये
  • होळी आणि दिवाळीला 500 रुपयांना सिलिंडर आणि 1 मोफत
  • गर्भवती महिलांसाठी 21 हजार रुपये आणि 6 पोषण किट
  • झोपडपट्टीवासीयांसाठी 5 रुपयांची थाळी
  • सर्व नागरिकांना 10 लाख रुपयांचे मोफत उपचार

दरम्यान, महिला समृद्धी योजनेसंदर्भात बोलताना रेखा गुप्ता म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी दिल्लीतील सर्व 48 भाजप आमदारांची आहे. महिलांसाठी आर्थिक मदतीसह आमची सर्व आश्वासने आम्ही निश्चितपणे पूर्ण करू. 8 मार्चपर्यंत पैसे निश्चितच महिलांच्या खात्यात हस्तांतरित केले जातील. 
 


सम्बन्धित सामग्री