मिनीगोवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसईत सध्या ख्रिसमसची लगबग सुरू झाली असून, त्या अनुषंगाने चीज, वस्तू आणि शोभेच्या साहित्यांनी बाजारपेठा सजलेल्या पाहायला मिळत आहेत. सालाबादप्रमाणे यंदाही उत्साहात ख्रिसमस साजरा करण्यात येणार असल्याने दुकानं, व्यावसायिक आणि ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
काय आहे नाताळ सणाचा इतिहास?
नाताळ हा शब्द लॅटिन भाषेचा नातूय या शब्दापासून तयार झालेला असून,त्याच्या अर्थ जन्म असा होतो. इंग्रजी भाषेत त्याला ख्रिसमस असे म्हणतात. येशु ख्रिस्ताचा जन्म जगाचा इतिहासातील सर्वात मोठी ब्राह्मणडनीय घटना होती.
ख्रिसमस डे उत्सव मध्ये ख्रिसमस ट्रीला खूप महत्त्व असते, त्यामागील एक आख्यायिका देखील सांगितली जाते, त्या दिवशी या झाडाची सजावट कशी सुरू झाली. ख्रिसमसच्या दिवशी सदाहरित वृक्ष सजवून उत्सव साजरा केला जातो, ही परंपरा जर्मनीपासून सुरू झाली, ज्यामध्ये एका आजारी मुलास संतुष्ट करण्यासाठी त्याच्या वडिलांनी सदाहरित वृक्ष सुंदरपणे तयार केला आणि त्याला एक भेट दिली.
याशिवाय असेही म्हटले जाते की, जेव्हा येशूचा जन्म झाला तेव्हा सर्व देवतांनी आनंद व्यक्त करण्यासाठी सदाहरित वृक्ष सजविला, तेव्हापासून हे झाड ख्रिसमसच्या झाडाचे प्रतीक मानले गेले आणि ही परंपरा लोकप्रिय झाली.
नाताळनिमित्त खास वातावरण
शॉपिंग आणि सजावट
सणाच्या तयारीला हातभार लावत, वसई- विरारमधील व्यापारी बाजारपेठांमध्ये रंगीबेरंगी ख्रिसमस ट्री, भेटवस्तू, गोड पदार्थ आणि सजावटीच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शाळांमध्ये देखील विद्यार्थ्यांनी ख्रिसमस ट्री सजवण्याचे स्पर्धा आयोजीत केल्या आहेत.
समारंभ आणि परिवाराचा आनंद
नाताळ सणाच्या निमित्ताने वसई- विरारमध्ये समारंभांची रेलचेल असेल. कुटुंबं एकत्र येऊन एकमेकांना गोड संदेश आणि भेटवस्तू देणार आहेत, तसेच सणाच्या आनंदात सहभागी होणार आहेत.