Greater Noida Dowry Murder Case: ग्रेटर नोएडाच्या कासना कोतवाली परिसरातील सिरसा गावात पत्नीला पेट्रोल ओतून ठार मारणारा आरोपी पती विपिन भाटी गुरुवारी पोलिसांच्या चकमकीत जखमी झाला. पोलिस आरोपीला तपासासाठी घटनास्थळी घेऊन जात असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दावा आहे की, विपिनला ज्वलनशील पदार्थ जप्त करण्यासाठी सिरसा गावात नेले जात होते. या दरम्यान त्याने अचानक त्याला घेऊन जाणाऱ्या उपनिरीक्षकाची पिस्तूल हिसकावून घेतली आणि पोलिस पथकावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळी झाडली आणि त्याच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन जेआयएमएस रुग्णालयात दाखल केले.
पत्नी निक्कीच्या हत्येचे आरोप
गुरुवारीच सिरसा गावात घडलेल्या या भीषण घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विपिन भाटीने पत्नी निक्कीवर 35 लाख रुपयांची हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने पेट्रोल ओतले आणि तिला जिवंत जाळले. या घटनेचा व्हिडिओ आणि साक्षीदारांच्या जबाबांमुळे प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. तपासानुसार, विपिनने प्रथम पत्नीचे केस धरून ओढले, नंतर तिच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून लाईटरने आग लावली. ही घटना त्याच्या बहिणीसमोर व सहा वर्षीय मुलाच्या डोळ्यासमोर घडली. मुलाने पोलिसांना सांगितले की, पप्पांनी आईवर काहीतरी ओतले आणि नंतर लाईटरने तिला पेटवलं. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा - Chhatrapati Sambhajinagar Crime: पतीने पत्नीच्या डोक्यात रॉड घातला गळफास लावून स्वत:लाही संपवलं
पोलिसांच्या ताब्यात असताना विपिनने स्वतःवरचे आरोप फेटाळले. तो म्हणाला की, मी तिला मारले नाही, तिने स्वतःहून पेटवून घेतले. मात्र, त्याच्या नातेवाईकांनीच सांगितले की, विपिनसोबत जे झाले ते अगदी योग्य होते, गोळी पायाला नाही तर छातीत लागायला हवी होती.
हेही वाचा - Uttar Pradesh: 35 लाखांची मागणी पूर्ण केली नाही म्हणून विवाहितेची हत्या; आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना
हुंडाबळीचा संशय
मृत निक्कीच्या कुटुंबाने सांगितले की, विपिन भाटी आणि त्याचे कुटुंब सतत पैश्यांची मागणी करत असतं. पैशांसाठी ते निक्कीवर अत्याचार करीत असतं. कसना पोलिस स्टेशन आणि सिरसा चौकीची टीम या कारवाईत सहभागी होती. विपिनला अटक करण्यात आल्यानंतर आता त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना पकडण्यासाठी वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली आहेत. सध्या कुटुंबातील सर्व सदस्य फरार आहेत.