Sunday, August 31, 2025 08:49:16 PM

Stock Market: भारत-पाक युद्धबंदीनंतर शेअर बाजारात उद्या काय परिस्थिती असेल?

भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र, आता युद्धंबदीनंतर पुढील आठवड्यात भारतीय शेअर बाजारत काय स्थिती असणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

stock market भारत-पाक युद्धबंदीनंतर शेअर बाजारात उद्या काय परिस्थिती असेल
Stock Market
Edited Image

Stock Market: भारत आणि पाकिस्तानने एकमेकांविरुद्ध लष्करी कारवाई थांबवली असून दोन्ही देशांनी युद्धबंदीची घोषणा केली आहे. शनिवारी भारताकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले की पाकिस्तानच्या विनंतीवरून भारताने हे पाऊल उचलले आहे. तथापि, युद्धबंदीपूर्वी, भारताने पाकिस्तानवर मोठा हल्ला केला, ज्यामध्ये पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले. या कारवाईत शेकडो दहशतवादी मारले गेले. एवढेच नाही तर भारताने पाकिस्तानचे अनेक लष्करी तळ उद्ध्वस्त केले आहेत. भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र, आता युद्धंबदीनंतर पुढील आठवड्यात भारतीय शेअर बाजारत काय स्थिती असणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

'या' घटकांचा दिसणार शेअर बाजारावर परिणाम - 

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी व्यतिरिक्त, आर्थिक डेटा, चौथ्या तिमाहीचे निकाल, परदेशी गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन आणि जागतिक ट्रेंड देखील गुंतवणूकदारांवर परिणाम करतील.

बाजारात चांगली वाढ अपेक्षित - 

मेहता इक्विटीज लिमिटेडचे ​​वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) प्रशांत तापसे यांनी सांगितले की, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांवरील दबाव कमी झाला आहे, जो वित्तीय बाजारांनी सकारात्मक संकेत म्हणून घेतला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या असे दिसून आले आहे की जेव्हा जेव्हा असे भू-राजकीय तणाव कमी होतात तेव्हा बाजारपेठा मजबूत होतात आणि वाढतात. त्यांनी असेही म्हटले की आता सर्वांचे लक्ष परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांवर (एफआयआय) असेल, ज्यांनी गेल्या दोन आठवड्यांपासून सतत निव्वळ खरेदी केल्यानंतर शुक्रवारी विक्री केली.

हेही वाचा - Gold Price: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारतात पुन्हा सोनं महागलं, दर लाखोंच्या पार

दरम्यान, रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे ​​संशोधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले की, अनेक महत्त्वाच्या देशांतर्गत घटकांमुळे हा आठवडा खूप महत्त्वाचा असेल. गुंतवणूकदार पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावासह विविध भू-राजकीय घटनांवर लक्ष ठेवतील. तसेच, आर्थिक आघाडीवर, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI), घाऊक किंमत निर्देशांक (WPI) आणि परकीय व्यापाराशी संबंधित महत्त्वाचा डेटा देखील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा असेल. या आठवड्यात टाटा स्टील, भारती एअरटेल, गेल, हिरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, ल्युपिन आणि भेल यासारख्या प्रमुख कंपन्यांचे तिमाही निकाल येणार आहेत, जे बाजाराच्या दिशेवर परिणाम करू शकतात.

हेही वाचा - Gold News: सोनं अचानक 7000 ने स्वस्त का झालं? किंमत आणखी कमी होणार?

तथापि, परदेशी गुंतवणूकदारांचा देशाच्या शेअर बाजारावरील विश्वास कायम असून त्यांनी मे महिन्यात आतापर्यंत 14,167 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितलं की, एप्रिलमध्ये मजबूत परदेशी संस्थात्मक गुंतवणूक (FII) आणि विक्रमी GST संकलनामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास बळकट झाला आहे, जो देशातील आर्थिक स्थिरता दर्शवितो. 

Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या! 
 


सम्बन्धित सामग्री