मुंबई: भारतात कोणतीही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी नारळ फोडण्याची परंपरा आजही अत्यंत श्रद्धेने पाळली जाते. पण ही केवळ परंपरा नसून तिच्यामागे खोल आध्यात्मिक आणि प्रतीकात्मक अर्थ दडलेला आहे. नवीन व्यवसाय, गृहप्रवेश, वाहन खरेदी किंवा धार्मिक विधी करताना नारळ फोडून सुरुवात केली जाते. यामागे भक्ती, विनम्रता आणि शुभ शकुनांचा विश्वास आहे.
शुभ कार्यापूर्वी नारळ का फोडला जातो?
हिंदू पुराणांनुसार, नारळ हे श्रीफळ मानलं जातं. नारळाचं कठीण कवच मानवी अहंकाराचं प्रतीक असून ते फोडल्यावर उघडणाऱ्या पांढऱ्या शुद्ध गरातून आपली अंतरात्मा आणि शुद्ध भावना प्रतीत होते. नारळातील पाणी शुद्धीकरणाचं प्रतीक मानलं जातं. जे विविध पूजांमध्ये देवांवर अर्पण केलं जातं. नारळावरील तीन डोळे त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात.
हेही वाचा - अस्वच्छता की दैवी इशारा? जेवणात केस सापडण्यामागचं आध्यात्मिक सत्य; जाणून घ्या
आरोग्यविषयक फायदे -
आध्यात्मिक महत्त्वाव्यतिरिक्त, नारळ पौष्टिकदृष्ट्या समृद्ध असते. यात मॅंगनीज, मॅग्नेशियम घटक असतात. नारळामुळे ऊर्जा, चयापचय आणि हायड्रेशनमध्ये मदत होते. नारळाच्या पाण्याला अनेकदा निसर्गाचे इलेक्ट्रोलाइट म्हटले जाते, जे शरीराला विषमुक्त करण्यास आणि मूत्रपिंडासंदर्भातील आजारांना प्रतिबंधित करण्यास मदत करते.
हेही वाचा - August Festival List 2025: रक्षाबंधन, हरतालिका तीज ते गणेश चतुर्थीपर्यंत ऑगस्टमध्ये 'हे' सण साजरे होणार
याशिवाय, सामाजिकदृष्ट्या नारळ एक कल्पवृक्ष समजला जातो. कारण त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो. पौष्टिकतेने समृद्ध असलेल्या नारळामध्ये शरीरासाठी उपयुक्त खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्सही असतात. त्यामुळे, नारळ फोडणे ही परंपरा न राहता, एक शुद्ध मनाने नवीन सुरुवात करण्याची सशक्त आणि आध्यात्मिक कृती बनते.
(Disclaimer: वरील सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून जय महाराष्ट्र कोणताही दावा करत नाही किंवा कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नाही.)