Sunday, August 31, 2025 11:12:16 PM

California Wildfires : कॅलिफोर्निया वाइन कंट्री, सेंट्रल ओरेगॉनमध्ये वणवे वेगाने पसरतायत; अग्निशमन दलाच्या जवानांची भीषण आगीशी झुंज

कॅलिफोर्नियाच्या वाइन कंट्री आणि सेंट्रल ओरेगॉनमध्ये रात्रभर वणवे तीव्र झाले आहेत, रविवारी कडक, कोरड्या परिस्थितीतही कर्मचारी आग विझवण्यासाठी झुंजत आहेत. शेकडो लोकांना स्थलांतर करावे लागले आहे.

california wildfires  कॅलिफोर्निया वाइन कंट्री सेंट्रल ओरेगॉनमध्ये वणवे वेगाने पसरतायत अग्निशमन दलाच्या जवानांची भीषण आगीशी झुंज

California Wildfires : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या विविध भागात वणवे वेगाने पसरले आहेत. या वणव्यांमुळे हजारो रहिवाशांना स्थलांतर करावे लागले आहे. उष्ण, कोरड्या असलेल्या या भागात वणव्यांमुळे मोठे नुकसान होते. येथील वातावरणीय परिस्थितीमध्ये आपोआप आगी लागतात आणि मोठे जंगल आणि रहिवाशी परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडतो. कठीण परिस्थितीत अग्निशमन दल आग विझवत आहे.

कॅलिफोर्नियाच्या वाइन कंट्री आणि सेंट्रल ओरेगॉनमध्ये रात्रभर वणवे तीव्र झाले आहेत, रविवारी कडक, कोरड्या परिस्थितीतही कर्मचारी आग विझवण्यासाठी झुंजत आहेत. शेकडो लोकांना स्थलांतर करावे लागले आहे. कॅलिफोर्नियातील नापा काउंटीच्या एटना स्प्रिंग्ज परिसरात लागलेली पिकेट आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेतले आहेत.

हेही वाचा - Tawi River Flood Alert to Pakistan : तावी नदीच्या संभाव्य मोठ्या पुराबद्दल भारताने पाकिस्तानला केली सूचना

ज्वालांनी वेढलेले, अग्निशमन दलाचे जवान पसरणाऱ्या आगीशी झुंजत आहेत. 23 ऑगस्ट 2025 पासून आग पसरत आहे. परिसरात आधी वातावरणामुळे आणि आता आगीमुळे प्रचंड उष्णता निर्माण झाली आहे. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. एटना स्प्रिंग्ज परिसरातील एका द्राक्षमळ्यावर आग भडकली आणि धुराचे मोठे ढग पसरले. आग आटोक्यात आणण्यासाठी 24 तास काम सुरू आहे.

आग इतक्या प्रमाणात वाढली आहे की, ती विझवण्यासाठी हेलिकॉप्टरचाही वापर कला जात आहे. हेलिकॉप्टरमधून पाणी आणून त्याचे फवारे आगीवर उडवले जात आहेत. रविवारी, 24 ऑगस्ट 2025 रोजी नापा काउंटीच्या एटना स्प्रिंग्ज परिसरात आग पसरत होती. तेव्हा एका हेलिकॉप्टरने पाण्याचा मारा केला. मात्र, या उपायालाही मर्यादा आहेत. हेलिकॉप्टर आगीच्या फार जवळ जाऊ शकत नसल्याने आग विझवण्याचे आव्हान अजूनही बरेच मोठे आहे.

हेही वाचा - Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला; स्फोटामुळे मोठे नुकसान


सम्बन्धित सामग्री