Thursday, August 21, 2025 12:35:38 AM

energy drink for summer : उन्हाळ्यात चक्कर, थकवा आणि अशक्तपणावर उपाय, रिकाम्या पोटी प्या 'हे' खास ड्रिंक

energy drink for summer : उन्हाळ्यात हळद आणि आलेपासून तयार केलेलं खास ड्रिंक अशक्तपणा, सूज, अपचन आणि त्वचासमस्या दूर करण्यासाठी खूप उपयोगी आहे.

energy drink for summer   उन्हाळ्यात चक्कर थकवा आणि अशक्तपणावर उपाय रिकाम्या पोटी प्या हे खास ड्रिंक
energy drink for summer : उन्हाळ्यात चक्कर, थकवा आणि अशक्तपणावर उपाय, रिकाम्या पोटी प्या 'हे' खास ड्रिंक

 energy drink for summer : एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच तापमानाने कहर माजवायला सुरुवात केली आहे. उन्हाळा जसजसा वाढतो तसतसे शरीरातील पाणी आणि पोषण दोन्ही घटू लागतात. यामुळं थकवा, त्वचाविकार, अपचन अशा अनेक समस्या निर्माण होतात. अशा वेळी शरीराला आतून ऊर्जा देणारा नैसर्गिक उपाय हवा असतो. हळद आणि आलेपासून तयार केलेलं हे खास ड्रिंक उन्हाळ्यातील अशक्तपणा, सूज, अपचन आणि त्वचासमस्या दूर करण्यासाठी खूप उपयोगी आहे. 

हळद-आलेची नैसर्गिक 'सुपरड्रिंक'
या ड्रिंकमध्ये हळदीतील 'कर्क्युमिन' हे घटक शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतो. तर आले शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी लढण्यास मदत करते. दोन्ही मिळून एक असा नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर तयार होतो. जो उन्हाळ्यात होणाऱ्या संसर्गांपासून बचाव करतो. 

हेही वाचा - सर्पदंशावर मंत्रतंत्र खरंच उपयोगी पडतात? या उपायाने जीव वाचतो? सत्य जाणून आश्चर्य वाटेल

पचनक्रिया सुधारते 
उन्हाळ्यात जड अन्न घेतल्यामुळे अपचनाची समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यात याचे प्रमाण वाढते. आले पाचक रस आणि एंझाइम वाढवून पचन सुधारते. तर हळद आतड्यांतील सूज कमी करून पाचन संस्थेला बळकट करते. 

हेही वाचा - पगार लगेच संपतो आणि महिनाअखेरीस वांदे होतात? हा खास फॉर्म्यूला करून देईल बचत 

त्वचेचा नैसर्गिक ग्लो वाढवतो
या ड्रिंकमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्त शुद्ध करून त्वचेला नैसर्गिक तेज देतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी हे ड्रिंक घेतल्यास मुंढ्यांपासून ते त्वचाविकारांपर्यंत अनेक गोष्टी नियंत्रणात येतात.

सांधेदुखी आणि थकवा कमी करतो
उन्हाळ्यात सांधेदुखी आणि सूज वाढण्याचे प्रकार समोर येतात. हळद आणि आले या दोन्ही घटकांमध्ये नैसर्गिक अँटी-इंफ्लेमेटरी गुण आहेत. जे सांध्यातील सूज आणि वेदना कमी करतात. तसेच दिवसभर फ्रेश वाटण्यासाठी ऊर्जा देतात. 

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री