गेल्या अनेक वर्षांपासून आपली आई आणि आपली आज्जी अनेक नवनवीन पदार्थ घरी बनवत असतात. त्या पदार्थ्यांना बनवताना अनेकदा तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तेलाशिवाय जेवण बनवणे याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. तेल हे नैसर्गिक तेलांचा एका विशिष्ट पध्दतीने प्रक्रिया केलेला प्रकार आहे, ज्याचा वापर अधिक केल्यास आरोग्यासाठी हानिकारक होऊ शकतो. मधुमेह, हृदयविकार यासारखे अनेक मोठमोठे आजार याच प्रक्रिया केलेल्या तेलांमुळे होतो. त्यामुळे अनेकदा हा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो, आणि ते म्हणजे काय होईल जर आपण तेलाचा वापर न करताच जेवण बनवण्यास सुरुवात केलो तर? चला तर जाणून घेऊया महिनाभर जेवणात तेल न वापरण्याचे फायदे.
हेही वाचा: रास्पबेरी खाल्ल्याने असंख्य फायदे मिळतात
1 - कॅलरी सेवन: तेलामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असते. तेलाचे सेवन कमी केल्याने कॅलरीजची संख्या कमी होते. त्यामुळे नैसर्गिकरित्या वजन कमी होण्यास सुरुवात होते.
2 - त्वचा नैसर्गिकरित्या होते चमकदार: आरोग्य तज्ज्ञांनुसार, जर महिनाभर तेलाचे सेवन केले नाही तर तुमची त्वचा चमकदार होण्यास सुरुवात होते आणि त्यासोबतच चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होते.
3 - हृदयाच्या समस्यांवर मात: तेलामध्ये असणाऱ्या कॅलरीज आणि फॅट्स असतात. त्यामुळे तुमच्या हृदयाला अनेक समस्या उद्भवू शकतात. मात्र तेलाचा वापर न केल्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
4 - फायबरचे प्रमाण होते अधिक: स्वयंपाकात तेलाचा वापर न केल्यामुळे शरीरात फायबरचे प्रमाण जास्त होऊ शकते. सोबतच आतडे निरोगी ठेवण्यासदेखील मोठ्या प्रमाणात मदत करते.
5 - निरोगी रक्तदाब पातळी: तेलाचा वापर कमी केल्यास रक्तदाब कमी होण्यास मदत करते. तेल न वापरलेले जेवण शरीरासाठी फायदेशीर असते.
हेही वाचा: Benifits Of Consuming Vegetarian Foods: या शाकाहारी पदार्थ्यांचे सेवन केल्यास तुम्हाला मिळणार...
6 - केस होतात निरोगी: एका संशोधनामध्ये असे निष्कर्ष समोर आले आहे की जेवणामध्ये तेल न वापरल्यामुळे केस जास्तकाळ निरोगी राहते.
7 - पचनशक्ती होते मजबूत: जर तुम्हाला पोटासंबंधित तक्रारी असतील तर तुम्ही तेलाचा वापर न करावे. असे केल्याने तुमची पचनशक्ती मजबूत होण्यास मदत करते.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)