पूर्वीच्या काळी, बॉडी मसाज केवळ राजा - महाराजा आणि इतर श्रीमंत लोकांनाच ती सुविधा होती. मात्र मागील काही वर्षांपासून शरीराला आराम मिळावे, त्यासोबतच शरीरामध्ये रक्ताचा प्रवाह सुरळीत व्हावा यासाठी अनेकजणांनी बॉडी मसाज करून घेण्यास सुरुवात केली. मात्र सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि बऱ्याच कारणांमुळे अनेकांच्या जीवनात ताण-तणाव वाढत आहेत. कॉलेज, नोकरी, यासारख्या अनेक ठिकाणी आपण बराच वेळ एकाच ठिकाणी बसतो. त्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागात अनेक समस्या निर्माण होतात. सध्या बॉडी मसाज मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून मानसिक आणि शारीरिक शांती मिळावी यासाठी सुद्धा बॉडी मसाज एक महत्त्वाचे साधन म्हणून पाहिले जाते. सध्याच्या काळात बॉडी मसाजला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बॉडी मसाज करण्याचे अनेक फायदे आहेत. चला तर जाणून घेऊया.
तणाव मुक्त होण्यास बॉडी मसाज फायदेशीर:
नियमित बॉडी मसाज केल्यामुळे कोर्टिसोलची पातळी कमी होते. हा एक प्रकारचा हार्मोन आहे ज्यामुळे आपल्याला तणाव जाणवतो. बॉडी मसाज केल्यामुळे ताण तणाव दूर होतात आणि तणाव मुक्त होण्यास मदत करते. बॉडी मसाज केल्यामुळे शरीराचं दुखणं थांबत आणि शरीर रिलॅक्स होण्यास सुरुवात होते. बॉडी मसाजमुळे शरीरामध्ये रक्तप्रमाण वाढते. बॉडी मसाजचे वैशिष्ट म्हणजे तुम्हाला स्नायूंच्या दुखण्यापासून अराम देतो.
हेही वाचा: उन्हाळ्यात सब्जा खाणे चांगले की चिया सीड्स?
शांत झोप लागण्यास होते मदत:
बॉडी मसाज केल्यामुळे शरीर रिलॅक्स होते त्यासोबतच शरीराला आराम मिळतो. ज्यामुळे लवकर झोप लागण्यास मदत होते. जर कामाच्या तणावामुळे शांत झोप लागत नसेल तर किमान १५ दिवसांतून एकदा किंवा आठवड्यातून एकदातरी बॉडी मसाज करावा. बॉडी मसाज केल्यामुळे मनातील सर्व चिंता दूर होऊन तुम्हाला सकारात्मक वाटू लागते. ज्यामुळे लवकर झोप लागते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
बॉडी मसाज केल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. सोबतच शरीरामध्ये पांढऱ्या पेशी वाढण्यासदेखील गुणकारी आहे. ज्यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहता.
हेही वाचा: वजन वाढण्यासाठी वापरा 'ह्या' ट्रिक
शरीराची झीज भरून काढण्यास बॉडी मसाज ठरते फायदेशीर:
ज्या महिलांची डिलिव्हरी होऊन दोन वर्ष झालेत . त्यांना कंबरदुखी, पाठदुखी यासारख्या अनेक प्रकारचा त्रास होतो.यादरम्यान बॉडी मसाज केल्याने त्यांना फायदा होतो. गरोदरपणामध्ये शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी बॉडी मसाज लाभदायी आहे.
बॉडी मसाजदरम्यान अशाप्रकारे घ्या स्वतःची काळजी:
बॉडी मसाज केल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या दूर होतात. परंतु बॉडी मसाज थेरेपिस्ट किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आणि चांगल्या तेलानेच बॉडी मसाज करून घ्यावे.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)