Wednesday, August 20, 2025 09:35:19 AM

Tricks For Cheap Holiday: पीक सिझनमध्ये प्रवास करायचा? 'या' स्मार्ट ट्रिक्समुळे वाचतील पैसे, आणि मिळेल भन्नाट अनुभव

पीक सिझनमध्ये फिरायला जाणं आता कठीण नाही! योग्य नियोजन आणि स्मार्ट टिप्समुळे प्रवास बजेटमध्ये होतो आणि आनंद द्विगुणित होतो. प्रवासाआधी ‘या’ गोष्टी नक्की वाचा.

tricks for cheap holiday पीक सिझनमध्ये प्रवास करायचा या स्मार्ट ट्रिक्समुळे वाचतील पैसे आणि मिळेल भन्नाट अनुभव

Tricks For Cheap Holiday: सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाला की सर्वांच्या मनात एकच विचार घोळतो. थोडं फिरून यावं! पण प्रत्यक्ष प्रवास ठरवताना आपण अनेक अडचणींचा सामना करतो. विमानभाड्याचे वाढते दर, हॉटेल्सचे अवास्तव दर, गर्दी आणि तिकीट मिळवण्याची कसरत यामुळे बऱ्याच जणांचा उत्साह थंडावतो.

मात्र, योग्य नियोजन आणि काही स्मार्ट युक्त्या वापरून तुम्ही तुमच्या बजेटमध्येही छानसा प्रवास अनुभवू शकता. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच काही प्रॅक्टिकल आणि ट्रेंडिंग टिप्स, ज्या तुम्हाला पैसे वाचवायला आणि ट्रिप अधिक एन्जॉय करायला मदत करतील!

1. प्रवासाच्या तारखांमध्ये लवचिकता ठेवा

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे प्रवासाच्या तारखा आखताना लवचिक राहा. शक्य असल्यास पीक सिझनच्या अगोदर किंवा नंतर म्हणजेच ‘शोल्डर सिझन’ मध्ये ट्रिप प्लॅन करा. या काळात ना फारशी गर्दी असते, ना दर गगनाला भिडलेले असतात. विशेषतः मंगळवार, बुधवार किंवा गुरुवार या दिवशी प्रवास केल्यास तुलनेने स्वस्त दरात तिकीट मिळू शकते. विकेंड्सच्या तुलनेत हे दिवस शांत असतात आणि विमानतळावरही फारशी गर्दी नसते.

2. अगोदरच बुकिंग केल्यास फायदाच फायदाच

'Last minute booking' म्हणजे महागडे डील्स. याऐवजी तुम्ही तुमचा प्रवास काही आठवडे आधी ठरवून तिकीट आणि हॉटेल बुकिंग केलंत, तर चांगली बचत होऊ शकते. काही ट्रॅव्हल अ‍ॅप्स आणि वेबसाइट्सवर दररोज नवी डील्स अपडेट होत असतात  त्यावर लक्ष ठेवणं फायद्याचं ठरतं. प्राईस अलर्ट्स सेट करा आणि स्वस्तात उत्तम डेस्टिनेशन मिळवा.

हेही वाचा: Needle Free Injection Technology: लहानग्यांची इंजेक्शनची भीती आता संपणार! नवा सुईविरहित उपाय जाणून घ्या

3. बजेट फ्रेंडली स्टे म्हणजे मजा + बचत

प्रवासात सर्वात मोठा खर्च होतो तो म्हणजे निवास. पण तुम्ही जर फक्त रात्री झोपण्यासाठीच जागा शोधत असाल, तर महागड्या हॉटेल्सपेक्षा हॉस्टेल्स, गेस्ट हाऊसेस, किंवा होमस्टे यावर विचार करा. विशेषतः जर तुम्ही मित्रांसोबत किंवा सोलो ट्रॅव्हल करत असाल, तर हे पर्याय खूप किफायतशीर ठरतात. एअरबीएनबी, बुकिंग डॉट कॉम यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर अपार्टमेंट्स किंवा वेकेशन होम्स सुद्धा सहज मिळतात तेही बजेटमध्ये आणि घरासारख्या सुविधांसह.

4. पॅकिंगमध्ये ‘स्मार्टनेस’ ठेवाअत्यावश्यक गोष्टींचं नीट नियोजन करून पॅकिंग केल्यास तुम्हाला प्रवासात अनावश्यक खरेदी टाळता येते. बेसिक मेडिकेशन, ट्रॅव्हल साईज टॉयलेटरीज, स्नॅक्स आणि एक छोटी बॉटल ठेवलीत तर वेळ आणि पैसे दोन्ही वाचतील. कॅरी ऑन लॅगेज मध्येच सर्व सामावल्यास चेक-इन बॅगेसचा खर्चही वाचतो.

हेही वाचा: Teen Addiction: कूल दिसण्यासाठी विष प्यायचं? तरूणांना भुरळ घालणारा ई-सिगारेटचा फसवा ट्रेंड

5. स्थानिक अनुभव घ्या, लक्झरी नव्हे

प्रवासात खरं सुख असतं ते त्या ठिकाणचा स्थानिक अनुभव घेण्यात. महागड्या रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सपेक्षा स्थानिक स्ट्रीट फूड, बाजार, आणि लोकल ट्रान्सपोर्ट वापरणं जास्त मनमोकळं आणि वॉलेट-फ्रेंडली ठरतं.
तुम्ही पर्यटन स्थळी गेल्यावर 'फ्री वॉकिंग टूर', 'कम्युनिटी होस्टेड एक्टिविटीज' यांसारख्या पर्यायांचा वापर करा अनुभव पण छान आणि खर्चही कमी.

प्रवास महाग असतो, पण नियोजन नीट केल्यास तो ‘अफोर्डेबल’ होऊ शकतो. तुम्हाला महागडे रिसॉर्ट्स किंवा बड्या शहरांची गरज नाही. स्वप्नवत ट्रिपसाठी कल्पक विचार, थोडं रिसर्च आणि थोडीच फ्लेक्सिबिलिटी हवी असते. सुट्ट्या जवळ येत असताना, टिप्स लक्षात ठेवा आणि तुमचा ट्रॅव्हल प्लॅन बजेटमध्येही सुपरहिट करा.


सम्बन्धित सामग्री