Sunday, August 31, 2025 09:23:20 PM

Chanakya Niti: आचार्य चाणक्यांचा विद्यार्थ्यांसाठी गुरुमंत्र; यश हवंय ना? मग या 4 गोष्टी नक्की करा

आचार्य चाणक्यांना धर्म, राजकारण, अर्थशास्त्र अशा अनेक विषयांतील तज्ज्ञ आणि द्रष्टे मानतात. सर्वांसाठी विद्यार्थीदशेत करावयाच्या आणि टाळावयाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जाणून घेऊ, चाणक्यांचा कानमंत्र..

chanakya niti आचार्य चाणक्यांचा विद्यार्थ्यांसाठी गुरुमंत्र यश हवंय ना मग या 4 गोष्टी नक्की करा

Chanakya Niti for students : आचार्य चाणक्यांनी सर्वांसाठी विद्यार्थीदशेत करावयाच्या आणि टाळावयाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. गुरुचा आदर, शिस्तीचं पालन, आळस आणि हव्यास टाळणं, तसेच मेहनत करण्याचा संदेश दिला आहे. अशा प्रकारे स्वयंशिस्त पाळल्यास विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे. चाणक्यनीतीमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा कानमंत्र दिला आहे. 

विद्यार्थ्यांसाठी चाणक्यांनी काय सांगितलं?
आचार्य चाणक्य यांनी 'चाणक्य नीती' नावाचा ग्रंथ लिहिला. यामध्ये त्यांनी मानवी जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्वतःची मते आणि अनेक सूत्रे सांगितली आहेत. यापैकी त्या काळानुसार योग्य होती तर काही आजही योग्य ठरताहेत. त्यापैकी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी त्यांनी महत्त्वाचा मंत्र दिला आहे. याचं पालन करून विद्यार्थी आपल्या जीवनात यश मिळवू शकतात. यामुळे त्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं. चला, जाणून घेऊ, आचार्य चाणक्यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या कानमंत्राविषयी..

हेही वाचा - Chanakya Niti : 'हे' लोक सापापेक्षा हजार पटींनी वाईट, आयुष्यात दुर्दैवच घेऊन येतात..! तुमच्याही सहवासात असे कोणी आहे का?

।। न मीमांस्य गुरवः ।। (गुरूंची अकारण चिकित्सा करू नये)
चाणक्य नीतीनुसार, विद्यार्थ्यांनी कधीही आपल्या गुरूंची अकारण चिकित्सा करत बसू नये किंवा टिंगलटवाळी करू नये. त्यांच्यावर चेष्टेच्या किंवा अनादराच्या हेतूने टीका करू नये आणि नेहमी गुरूचा आदर करावा. गुरू हे कोणत्याही मनुष्याच्या जीवनात अत्यंत महत्त्वाच्या जागी असतात. त्यामुळे त्यांना योग्य तो आदर देणं आवश्यक आहे. त्यांच्याशी चर्चा करून आपल्या शंकांचं जरूर समाधान करावं. विनम्र रहावं. चांगल्या हेतूने त्यांनी बोललेल्या कठोर उद्गारांचा किंवा त्यांच्या शिस्तप्रिय वर्तनाचा राग मनात धरू नये.

स्वतःच्या स्वप्नांसाठी आणि ध्येयासाठी कठोर परिश्रमाची तयारी असावी
आचार्य चाणक्य यांच्या मते, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या स्वप्नांसाठी आणि ध्येयासाठी नेहमी कठोर परिश्रम करत राहायला हवं. कठोर परिश्रम करण्यासाठी शिस्तीचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे शिस्तीला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवलं पाहिजे, जेणेकरून, इप्सित साध्य होऊ शकेल.

आळस झटकून टाका
आपल्या प्रत्येकासाठी आळस हा सर्वांत मोठा शत्रू आहे. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर रहावे. आळसामुळे परिश्रम करणे मी होते आणि यश मिळण्यापासून आपण दूर जाऊ लागतो. त्यामुळे आळसाला आपल्यापासून दूर ठेवणं सर्वांत महत्त्वाचं आहे. आपल्याला आपल्या कठोर परिश्रमाच्या व निष्ठेच्या बळावरच यश मिळणार आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

हेही वाचा - चाणक्य नीती : नका जाऊ या ठिकाणी मुळीच.. अन्यथा, तुमच्या प्रतिष्ठेला बसेल धक्का; स्वाभिमान होईल चक्काचूर!

लालूच, लोभ, हाव हे मोठे शत्रू
विद्यार्थ्यांनी नेहमी लालूच, लोभ, हाव यापासून नेहमी दूर राहावं. विद्यार्थी जीवनात असताना क्षुल्लक लोभ निर्माण होणे, भावनांवर ताबा न राहणे, लोभामुळे ध्येपासून ढळणे ही एक मोठी समस्या आहे. लोभामुळे व्यक्ती आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा वेळ वाया घालवते. म्हणूनच, आचार्य चाणक्य म्हणतात की, आळसाइतकाच लोभ हाही आपला एक घातक शत्रू आहे.

आचार्य चाणक्य हे प्राचीन भारतातील एक महान अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी सांगितलेली धोरणं (चाणक्य नीती) व्यक्तीला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात आणि त्यांचं पालन केल्यास कोणतीही व्यक्ती जीवनात यश मिळवू शकते किंवा आधीपेक्षा अधिक चांगल्या ठिकाणी पोहोचू शकते. आचार्य चाणक्य धर्म, राजकारण, अर्थशास्त्र अशा अनेक विषयांतील तज्ज्ञ आणि द्रष्टे मानले जातात.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री