Sunday, August 31, 2025 05:11:17 PM

तुम्हीही लॅपटॉपवर तासन्तास काम करताय का? डोळ्यांसह मानदुखीवर करा 'हे' उपाय

सकाळी उठताच मोबाईल पाहणे किंवा दिवसभर स्क्रीनकडे पाहणे, यामुळे डोळ्यांचे स्नायू आकुंचन पावतात. त्यामुळे डोळ्यांमध्ये थकवा, कोरडेपणा आणि हलकी आग जाणवू शकते.

तुम्हीही लॅपटॉपवर तासन्तास काम करताय का डोळ्यांसह मानदुखीवर करा हे उपाय
Disadvantages of laptop use
Edited Image

Disadvantages of Laptop and Mobile Use: जर तुम्हाला सकाळी उठल्यावर लगेचच मोबाईल हातात घेण्याची सवय असेल, तर आता ती बदलणे गरजेचे आहे. ही सवय केवळ डोळ्यांचे नुकसान करत नाही, तर तुमच्या मानेवर, खांद्यांवर आणि मणक्यावरही हळूहळू गंभीर परिणाम करू शकते. तज्ञांच्या मते, सतत एकाच स्थितीत काम केल्याने मानेचे स्नायू कमजोर होतात आणि त्याचा परिणाम थेट मणक्यावर होतो.

हेही वाचा - पोट फुगल्यासारखं वाटतंय? याचं कारण आतड्याची सूजही असू शकते; हे पदार्थ औषधाशिवाय बरं करतील

मोबाईल आणि लॅपटॉपच्या वापराचे तोटे - 

डोळ्यांचे आरोग्य बिघडते - 

सकाळी उठताच मोबाईल पाहणे किंवा दिवसभर स्क्रीनकडे पाहणे, यामुळे डोळ्यांचे स्नायू आकुंचन पावतात. त्यामुळे डोळ्यांमध्ये थकवा, कोरडेपणा आणि हलकी आग जाणवू शकते.

डोकेदुखी - 

सतत मान वाकवून काम केल्याने डोक्यापर्यंत पोहोचणाऱ्या रक्तप्रवाहावर परिणाम होतो. त्यामुळे सतत डोकेदुखी जाणवते.

खांदा आणि मानदुखी - 

लॅपटॉपसमोर तासन्तास बसल्याने खांदे आणि मानदुखी उद्भवू शकते. यामुळे वेदना वाढत जातात आणि हळूहळू मणक्यालाही इजा पोहोचू शकते.

समस्या टाळण्यासाठी 'हे' उपाय करा - 

स्ट्रेचिंग करा: दर तासाला 4-5 मिनिटे उठून हात, खांदे आणि मान हलवणे आवश्यक आहे. स्ट्रेचिंगमुळे स्नायूंमध्ये लवचिकता राहते आणि कडकपणा कमी होतो.

कॅल्शियमयुक्त आहार: दूध, दही, चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळे हाडे मजबूत राहतात आणि वेदनांपासून संरक्षण मिळते.

व्हिटॅमिन डी मिळवा: दररोज सकाळी 15-20 मिनिटे नैसर्गिक सूर्यप्रकाशात बसणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला आवश्यक व्हिटॅमिन डी मिळते, जे हाडांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

हेही वाचा - Office Stress : कामामुळे ताण वाढतोय? फक्त 10 मिनिटे करा ही 3 योगासने; लगेच मिळेल आराम

डोकेदुखी आणि मानदुखीचा त्रास टाळण्यासाठी सकाळी उठताच मोबाईल न पाहण्याचा संकल्प करा. दिवसभर स्क्रीन वापरताना विश्रांती घेणे, योग्य आहार घेणे आणि नियमित व्यायाम केल्यास डोळ्यांपासून मणक्यापर्यंत अनेक समस्या टाळता येतील. 

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.) 


सम्बन्धित सामग्री