Wednesday, August 20, 2025 11:30:06 PM

Cucumber Pickle Recipe: काकडीपासून लोणचे कसे बनवायचे तुम्हाला माहिती आहे का?

काकडीपासून लोणचे कसे बनवायचे तुम्हाला माहिती आहे का?

cucumber pickle recipe काकडीपासून लोणचे कसे बनवायचे तुम्हाला माहिती आहे का

मुंबई : उन्हाळा सुरू झालं म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची लोणची बनवायला सुरूवात होते. आंबा, लिंबू यांपासून बनवलेले लोणचे आंबट आणि स्वादिष्ट लागते. मात्र काकडीपासून लोणचे कसे बनवायचे तुम्हाला माहिती आहे का? काकडीचं लोणचं खूप स्वादिष्ट आणि झटपट बनवता येतं. हे लोणचं फ्रेश खाल्लं तरी छान लागतं आणि 2-3 दिवस टिकवूनही खाता येतं. 

काकडीचे लोणचे बनवण्याची रेसिपी 


साहित्य:
काकडी – 2 मध्यम आकाराच्या काकडी 

मीठ – 1 टीस्पून (चवीनुसार)

हळद – 1/2 टीस्पून

तिखट – 1-2 टीस्पून (तिखटपणानुसार)

मोहरीची डाळ – 1 टीस्पून

मेथ्या – 1/2 टीस्पून

हिंग – 2-3 चिमूट

लिंबाचा रस – 2-3 टेबलस्पून (चवीनुसार)

तेल – 2 टेबलस्पून (सूर्यफूल/गोडतेल/शेंगदाण्याचं)

हेही वाचा : दुधाचा चहा पिणे चांगले की वाईट? महिनाभर नाही घेतला तर काय होईल?

कृती:
काकडी धुवून घ्या. त्यानंतर साल काढा. काकडी कापून बिया काढा. त्याचे छोटे तुकडे करा. त्यानंतर एका मोठ्या वाटीमध्ये काकडीचे तुकडे, मीठ, हळद, तिखट आणि लिंबाचा रस एकत्र करून नीट मिक्स करा. एका छोट्या पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरीची डाळ, मेथ्या, आणि हिंग घालून फोडणी द्या. ही फोडणी काकडीच्या मिश्रणावर घाला आणि नीट मिक्स करा. यानंतर 15-20 मिनिटं झाकून ठेवा जेणेकरून चव एकजीव होईल.

काकडीचं हे लोणचं 2-3 दिवस फ्रिजमध्ये छान टिकतं. अजून जास्त दिवस टिकवायचं असल्यास तेल आणि मीठ थोडं वाढवा. हवं असेल तर थोडं लोणचं मसाला पण घालू शकता.

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
 


सम्बन्धित सामग्री