Best Foods to Boost Memory: आठवड्यातून फक्त दोन अंडी खाल्ल्याने तुमच्या मेंदूला याचा किती फायदा होऊ शकतो? हे तुम्हाला माहिती आहे का? सुपरफूड म्हणून ओळखले जाणारे अंडे आता संशोधनामुळे आणखी खास बनले आहे. पूर्वी कोलेस्टेरॉलच्या भीतीमुळे अनेक जण, विशेषतः हृदयविकार असलेले लोक, अंडी टाळत असतं. मात्र, नवीन संशोधनानुसार, अंडी केवळ सुरक्षितच नाहीत तर मेंदूला तल्लख ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
अल्झायमरचा धोका 47 टक्क्यांनी कमी होतो -
‘द जर्नल ऑफ न्यूट्रिशन’ मध्ये प्रकाशित संशोधनानुसार, आठवड्यात दोन किंवा अधिक अंडी खाणाऱ्या वृद्धांमध्ये अल्झायमर डिमेंशियाचा धोका तब्बल 47 टक्क्यांनी कमी आढळला. सुमारे सात वर्षे चाललेल्या या अभ्यासात 1,000 वृद्धांचा समावेश होता. निष्कर्ष स्पष्ट सांगतात की, अंडी खाणाऱ्यांमध्ये विस्मरणाचा आजार कमी प्रमाणात आढळतो.
हेही वाचा - Cancer Detection With Diamonds: कर्करोग तपासणीसाठी हिरे ठरणार गेमचेंजर; ब्रिटिश संशोधकांनी लावला अजब शोध
कोलीन आणि ओमेगा-3 चा स्त्रोत
अंड्यांमध्ये असलेले कोलीन हे पोषक तत्व आपल्या स्मरणशक्तीसाठी महत्वाचे आहे. हे ‘एसिटाइलकोलीन’ नावाचे न्यूरोट्रान्समीटर तयार करते, जे मेंदूची स्मरणशक्ती व निर्णयक्षमता टिकवून ठेवते. संशोधनानुसार कोलीन अल्झायमर 39 टक्के पर्यंत रोखण्यास मदत करू शकते. त्याशिवाय अंड्यांमधील ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स आणि ल्युटीन मेंदूतील जळजळ व नुकसान कमी करतात.
हेही वाचा - Green Chilli Benefits: हिरवी मिरची आहे पचनाचे टॉनिक! रिकाम्या पोटी खाल्ल्याने मिळतात 'हे' अनोखे फायदे
दरम्यान, 600 लोकांच्या मेंदूच्या पोस्टमॉर्टममध्ये दिसून आले की नियमित अंडी खाणाऱ्यांच्या मेंदूत अल्झायमरशी संबंधित हानिकारक प्लेक्स कमी होते. यामुळे अंडी खाण्याचे फायदे केवळ अंदाज नव्हे तर वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहेत. अल्झायमर हा आजार लाखो लोकांसाठी मोठी समस्या ठरत आहे. भविष्यात त्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवड्यातून दोन अंडी खाणे हा मेंदूला सुरक्षित ठेवण्याचा एक सोपा व स्वस्त उपाय ठरू शकतो.
याशिवाय, आधुनिक संशोधनानुसार, आठवड्यात दोन अंडी बहुतेक लोकांसाठी सुरक्षित आहेत. मात्र, अंडी नेहमी संतुलित आहाराचा भाग म्हणून घ्यावीत. हिरव्या भाज्या, मासे, कडधान्ये आणि संपूर्ण धान्ये देखील मेंदूसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. आठवड्यात फक्त दोन अंडी तुमची स्मरणशक्ती वाढवू शकतात. तसेच तुमचा मेंदू तल्लख ठेऊ शकतात आणि तुमचे अल्झायमरपासून संरक्षण करू शकतात.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)