Monday, September 01, 2025 06:37:42 AM

Health Tips: थंड पाण्याने तोंड धुतल्याने मानसिक स्वास्थ्यावर परिणाम, फायदा की तोटा?

रडल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुणे हा मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याचा एक सोपा, नैसर्गिक आणि प्रभावी मार्ग आहे. चला जाणून घेऊया...

health tips थंड पाण्याने तोंड धुतल्याने मानसिक स्वास्थ्यावर परिणाम  फायदा की तोटा

Health Tips: आयुष्यात कधीकधी ताणव निर्माण करणारे प्रसंग येतात किंवा चढ-उतार येतात. एखादी व्यक्ती आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. तेव्हा खूप रडू लागते. बहुतेक लोकांसोबत कधी ना कधी असे घडले असेल. रडण्यामागील कारण वेगळे असू शकते, परंतु रडल्यानंतर एक गोष्ट निश्चितच सामान्य आहे आणि ती म्हणजे रडल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुणे. हो, अनेकदा तुम्ही लोकांना किंवा स्वतःलाही रडल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुताना पाहिले असेल. पण तुम्हाला यामागील खरे कारण माहित आहे का? जर तुम्हाला असे वाटत असेल की हे फक्त डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी किंवा चेहरा स्वच्छ करण्यासाठी केले जाते, तर असे अजिबात नाही. रडल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुणे हा मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याचा एक सोपा, नैसर्गिक आणि प्रभावी मार्ग आहे. चला जाणून घेऊया...

मानसिक आरोग्य आणि थंड पाण्याचे कनेक्शन

मज्जासंस्था शांत होते
जेव्हा एखादी व्यक्ती रडते तेव्हा त्याच्या शरीरात कॉर्टिसोल नावाचा स्ट्रेस हार्मोन बाहेर पडतो. ज्यामुळे थकवा येतो आणि मन जड होते. पण जेव्हा चेहरा थंड पाण्याने धुतला जातो तेव्हा स्ट्रेस हार्मोन्सची पातळी कमी होते, शरीर ताजेतवाने वाटते आणि मज्जासंस्था शांत वाटते. ज्यामुळे शरीराला चांगले वाटणारे आनंदी(Happy) हार्मोन्स देखील बाहेर पडू लागतात.

हेही वाचा: Chanakya Niti : चाणक्य म्हणतात, करोडपती होण्यासाठी हे 5 गुण आवश्यक; आजमावून पाहा

हॅपी हार्मोन (आनंदाचे संप्रेरक) वेदना कमी करतात
रडल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुतल्याने शारीरिक आणि भावनिक वेदना कमी होण्यास मदत होते. थंड पाणी मेंदूला विद्युत प्रेरणा पाठवते, ज्यामुळे एंडोर्फिनसारख्या चांगल्या भावना निर्माण करणाऱ्या हार्मोन्सचा स्त्राव सुरू होतो, जे मूड सुधारून ताण कमी करण्यास मदत करतात.

थंड पाणी तुम्हाला तणावमुक्त ठेवते
जेव्हा तुम्ही थंड पाण्याने चेहरा धुता तेव्हा तुमच्या शरीराचे तापमान कमी होते. यामुळे तुमच्या मेंदूला थोडासा धक्का बसतो आणि व्यक्तीला तणावमुक्त आणि ताजेतवाने वाटते.

(Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र यातून कोणताही दावा करत नाही किंवा याची हमी देत नाही.)
 


सम्बन्धित सामग्री