Wednesday, August 20, 2025 08:42:50 PM

गूगल पे-फोनपेचे डुप्लिकेट अ‍ॅप्स बाजारात; फसवणुकीपासून वाचायचंय? मग हे वाचाच

सायबर गुन्हेगार आता फसवणूकीसाठी नव्या क्लृप्त्या वापरत आहेत. सध्या बाजारात गूगल पे आणि फोन पे  सारखी हुबेहुब दिसणारी फर्जी अ‍ॅप्स उपलब्ध आहेत.

गूगल पे-फोनपेचे डुप्लिकेट अ‍ॅप्स बाजारात फसवणुकीपासून वाचायचंय मग हे वाचाच
गूगल पे-फोनपेचे डुप्लिकेट अ‍ॅप्स बाजारात; फसवणुकीपासून वाचायचंय? मग हे वाचाच

आजकालची आर्थिक देवाणघेवाण जवळपास डिजिटल पद्धतीनं केली जात आहे. गूगल पे, फोन पे, पेटीएम यांसारख्या UPI अ‍ॅप्समुळं नागरिकांचे व्यवहार जलद, सुलभ आणि रोखरहित झाले आहेत. पण या डिजिटल क्रांतीचा गैरफायदा घेणारे सायबर गुन्हेगारही आता नव्या क्लृप्त्या वापरत आहेत. सध्या बाजारात गूगल पे आणि फोन पे सारखी हुबेहुब दिसणारी फर्जी अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. या अ‍ॅप्सचा वापर करून अनेक दुकानदारांना फसवण्याचे प्रकार समोर येत आहेत.

या नकली अ‍ॅप्सचा मोठा प्रसार टेलिग्राम सारख्या अ‍ॅप्सवरून होत असल्याचं समोर आलं आहे. सायबर गुन्हेगार ग्राहक बनून दुकानात येतात. ते पेमेंट करतात. पण हे अ‍ॅप्स अशा प्रकारे डिझाइन करण्यात आलेले आहेत. ज्यात पेमेंटचा खोटा स्क्रीनशॉट, ट्रान्झॅक्शन नंबर आणि अगदी साऊंड बॉक्सवर येणाऱ्या पेमेंट कंफर्मेशनची आवाज सुद्धा तयार होते. त्यामुळे अनेक व्यापारी या बनावट व्यवहाराला खरे समजतात आणि वस्तू किंवा सेवा देऊन आर्थिक नुकसान करून घेतात.

हेही वाचा -  पॅराग्लायडिंगचा अनुभव घेण्यासाठी 'ही' आहेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणे

या ठिकाणी होते सर्वाधिक फसवणूक 
खासकरून त्या ठिकाणी जिथे दिवसातून शेकडो व्यवहार होतात. तिथं व्यापारी प्रत्येक व्यवहार तपासून पाहू शकत नाहीत. हीच घाई सायबर गुन्हेगारांच्या फायद्याची संधी ठरते. त्यामुळं प्रत्येक व्यापाऱ्यानं साऊंड बॉक्सच्या आवाजावर न भरवसा ठेवता आपल्या अ‍ॅपमध्ये प्रत्यक्ष व्यवहार झालाय का, हे खात्री करूनच ग्राहकाला माल द्यावा.

हेही वाचा - भावनेच्या भरात तयार केलेले घिब्ली फोटो सुरक्षित आहेत का?

फसवणूक होऊ नये म्हणून काय करावं 
व्यापाऱ्यांनी किंवा नागरिकांनी UPI पेमेंट झाल्यानंतर बँक अ‍ॅप किंवा अधिकृत अ‍ॅप तपासावं. फक्त साउंड बॉक्स किंवा स्क्रीनशॉटवर विश्वास ठेवू नये. याशिवाय ट्रान्झॅक्शन आयडीला क्लिक करून डिटेल्स पहावे, असं केल्यास आपली फसवणूक होणार नाही. याशिवाय अधिकृत अ‍ॅप्स व त्यांचे अपडेट्स प्ले स्टोअरमधूनच डाउनलोड करणे गरजेचं आहे. जर तुमच्या आसपास सायबर गुन्ह्याचा प्रकार घडल्यास तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असं आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आलं आहे. 
 


सम्बन्धित सामग्री