Thursday, August 21, 2025 12:08:30 AM

हिवाळ्यात या 5 फळांचे सेवन नक्की करा

हिवाळ्यात ही 5 फळे तुम्हाला निरोगी ठेवणार

हिवाळ्यात या 5 फळांचे सेवन नक्की करा

हिवाळा हा नेहमी अनेक आजरांना आपल्यासोबत सोबत घेऊन येतो. हिवाळ्यात लोकांची आजारी  पडण्याची संख्या ही इतर ऋतुंपेक्षा जास्त असते. हिवाळ्यात या ५ फळांचे सेवन  तुमचं आरोग्य निरोगी ठेवू शकतात. 

सफरचंद - सफरचंद हे हिवाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. सफरचंद हे फळ आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यात असलेले व्हिटॅमिन-सी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. या बरोबरच सफरचंदात फायबर , पेक्टिन  आणि अँटी-ऑक्सिडंट्स असल्याने ते पचनसंस्थेच्या आरोग्याला फायदेशीर ठरते. मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठीही हे फळ खूप उपयुक्त आहे.

संत्री - गोड आणि आंबट चवीने भरलेली संत्री आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. या फळात व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम, फोलेट आणि इतर अनेक पोषक घटक असतात. व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, ज्यामुळे विविध प्रकारच्या इन्फेक्शन्सपासून संरक्षण मिळते. संत्री खाल्ल्यामुळे कर्करोगाचा धोका देखील कमी होऊ शकतो. हिवाळ्यात हे फळ नियमितपणे खाल्ल्याने हंगामी आजार टाळता येऊ शकतात.

पेरू- हिवाळ्याच्या मोसमात पेरू सहज उपलब्ध होतात. पौष्टिक घटकांनी भरलेले हे फळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, फोलेट, पोटॅशियम, फायबर आणि इतर अनेक पोषक तत्व असतात. जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या असतील, तर पेरू आपल्या आहारात समाविष्ट करणे खूप उपयुक्त ठरेल.

द्राक्षे - द्राक्षे फायबरयुक्त असतात, ज्याने पचनसंस्था सुधारते. द्राक्षांमध्ये असलेले नैसर्गिक फायटोकेमिकल्स शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे विविध आरोग्यासंबंधीच्या समस्या निर्माण होण्याचा धोका कमी होतो.

प्लम -  हे फळ व्हिटॅमिन ए, सी आणि के यासोबतच मँगनीज, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असते. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे, कारण यामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.


सम्बन्धित सामग्री