Sunday, August 31, 2025 10:13:09 PM

Ganpati Decoration Market : गणपती सजावटीसाठी स्वस्तात मस्त खरेदी कुठे कराल? जाणून घ्या एका क्लिकवर

बाप्पा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता लागली आहे ती बाप्पाचे डेकोरेशन कसे करायचे? यावर्षी खरेदीसाठी कुठे जायचं?, जाणून घ्या..

ganpati decoration market  गणपती सजावटीसाठी स्वस्तात मस्त खरेदी कुठे कराल जाणून घ्या एका क्लिकवर

Ganpati Decoration Market: बाप्पा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या वर्षी 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असून या दिवशी बाप्पा विराजमान होणार आहे. त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता लागली आहे ती बाप्पाचे डेकोरेशन कसे करायचे? यावर्षी खरेदीसाठी कुठे जायचं? त्यामुळे आम्ही तुम्हाला बाप्पाच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य मुंबईत स्वस्तात मस्त कुठे मिळेल, ते सांगणार आहोत. 

गणपती सजावटीसाठी स्वस्त आणि मस्त खरेदी कुठे कराल? 
दादर मार्केट (Dadar Market)

गणपतीचे साहित्य खरेदी करण्यासाठी दादर मार्केटला मोठी पसंती दिली जाते. जिथे कृत्रिम फुले, कृत्रिम फुलांच्या माळा, वेगवेगळ्या प्रकारचे मखर, पडदे, दिवे, विविध प्रकारचे लाईटिंग, लाईट्स आणि इतर सजावटीच्या वस्तू स्वस्तात मस्त दरात मिळतील. दादर पश्चिम येथे अनेक गल्ल्यांमध्ये गणपती डेकोरेशनचे साहित्य होलसेल दरात मिळते. दादर मार्केटमध्ये सुंदर आणि आकर्षक मखर 400 रुपयांपासून ते 25000 रुपयांपर्यत उपलब्ध आहेत. गणपतीचे डेकोरेशन करण्यासाठी नेटचे पडदे 20 रुपयांमध्ये एक मीटर, टिकल्यांचे पडदे 45 रुपये मीटर दरात तुम्हाला हवे तसे पडदे वेगवेगळ्या दरांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच दादर पश्चिम भागातच फुलांचे मार्केट असल्याने तिथे खरेदीसाठी गेल्यावर गणपती पूजेसाठी लागणारी फुलेही खरेदी करता येऊ शकतात. 

हेही वाचा: How to Store Coriander: फ्रीजशिवाय आठवडाभर कोथिंबीर ताजी ठेवण्यासाठी जाणून घ्या 'या' 5 सोप्या ट्रिक्स

क्रॉफर्ड मार्केट (Crawford Market)
गणपतीच्या खरेदीसाठी मुंबईतील सर्वात चर्चेत असणारे ठिकाण म्हणजे क्रॉफर्ड मार्केट होय. क्रॉफर्ड मार्केटमध्ये वेगवेगळ्या रंगाची कृत्रिम फुले, फुलांच्या माळा, वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स तसेच मखर या ठिकाणी उपलब्ध आहेत. कृत्रिम फुलांमध्ये चिनी बनावटीची फुले 30 रुपये डझन, कपड्याची माळ 250 ते 350 रुपये जोडी, फायकस पती 600 रुपये, घरगुती सजावटीचा दर्शनीय फुलांचा सेट 800 रुपयांपर्यंत मिळत आहे. क्रॉफर्ड मार्केटमध्ये गणपतीसाठी लागणाऱ्या वस्तू, विशेषतः कृत्रिम फुले, सजावटीच्या वस्तू, आणि विविध प्रकारच्या गणेश मूर्ती खरेदी करता येतात. हे मार्केट होलसेल वस्तू खरेदीसाठी प्रसिद्ध असून, येथे स्वस्त दरात गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तू उपलब्ध असतात. 

गणपती सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी भुलेश्वर मार्केटदेखील क्रॉफर्ड मार्केटच्या जवळचं आहे. 400 रुपयांना 100 कृत्रिम फुले मिळतील. फुलांच्या माळा किंवा तोरण 40 रुपयांपासून पुढील दरांमध्ये उपलब्ध आहे. सात कलरमधील वेगवेगळी फुले 700 रुपयांना 20 डझन मिळतील. 

ठाणे मार्केट (Thane Market)
ठाणे पश्चिम भागात मोठी बाजारपेठ आहे. हा देखील गणपती खरेदीसाठी उत्तम पर्याय आहे. या ठिकाणी विविध आकर्षक रंगाचे आणि डिझाईनचे पडदे 60 रुपयांपासून मिळतील. कृत्रिम फुलांच्या माळांची जोडी 150 रुपये, साध्या फुलांच्या माळा 50 रुपयांना आहेत. फुलांच्या वेली 150 रुपये डझन दरामध्ये उपलब्ध आहेत. तसेच गणपतीच्या सजावटीसाठी लागणारे इतर साहित्य देखील बजेटमध्ये मिळेल. 


सम्बन्धित सामग्री