शेळीच्या विष्ठेत असणाऱ्या काही विशिष्ट घटकांमुळे शेती आणि औषधीय क्षेत्रात त्याची मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, अनेकांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल आणि ते म्हणजे, नेमकं कोणत्या कारणांमुळे शेळीच्या विष्ठेला इतकी मागणी आहे? चला तर जाणून घेऊया सविस्तर.
1 - सेंद्रिय खत म्हणून उपयोग: शेळीची विष्ठा सेंद्रिय खत म्हणून अत्यंत उपयुक्त मानली जाते. शेळीच्या विष्ठेची मोठ्या प्रमाणात मागणी असण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
शेळींची होणारी पचन प्रक्रिया आणि खताचा दर्जा: शेळ्या वनस्पती आणि गवत पचवत असताना शेळी त्यातील पोषणमूल्य टिकवून ठेवतात. त्यामुळे त्यांची विष्ठा नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम (NPK) आणि इतर सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध असते.
शेळीची विष्ठा मातीची सुपीकता वाढवते: शेळीची विष्ठा जेव्हा जमिनीत मिसळते, तेव्हा ती मातीची सुपीकता वाढवते आणि त्यासोबत मातीची जलधारण क्षमतादेखील सुधारते.
शेळीची विष्ठा सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त: रासायनिक खतांमुळे मातीची गुणवत्ता घसरते. त्यामुळे सेंद्रिय शेती करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात शेळीच्या विष्ठेचा उपयोग करतात.
2 - किंमत परवडणारी आणि सहजपणे उपलब्ध होत असल्यामुळे: गायीच्या शेणाच्या तुलनेत शेळीची विष्ठा मोठ्या प्रमाणात स्वस्त आणि सहजपणे उपलब्ध असते. त्यासोबतच, शेळीची विष्ठा सहजपणे साठवता येते आणि ते वाहतुकीसाठीदेखील सोप्पी असते. त्यामुळे शेळीची विष्ठा विक्रीसाठी चांगला पर्याय ठरते.
3 - केंचुआ खत निर्मितीमध्ये वापर: शेळीच्या विष्ठेचा उपयोग केंचुआ खत तयार करण्यासाठी प्रामुख्याने केला जातो. केंचुआंच्या पोषणासाठी शेळीची विष्ठा उपयुक्त असते आणि त्यामुळे खताचा दर्जा सुधारण्यास मदत होते.
4 - औषधी गुणधर्म आणि आयुर्वेदिक उपयोग: आयुर्वेदात शेळीच्या विष्ठेचे औषधी गुणधर्म सांगितले आहेत. काही पारंपरिक उपचारांमध्ये शेळीच्या विष्ठेचा उपयोग केला जातो. शेळीच्या विष्ठेत असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे ती औषधी कंपन्यांकडून मोठ्या संख्येने विकत घेतली जाते.
5 - उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रात शेळीच्या विष्ठेचा होणारा वापर: ज्याप्रमाणे, गायीच्या विष्ठेपासून बायोगॅस तयार करता येतो, त्याप्रमाणेच शेळीच्या विष्ठेच्या विष्ठेपासून बायोगॅस तयार करता येतो. त्यामुळे ऊर्जानिर्मितीसाठी शेळीची विष्ठा वापरली जाते. काही ठिकाणी खात उत्पादक कंपन्या शेळीची विष्ठा मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यासोबतच, त्यावर प्रक्रिया करून त्याला विविध कंपन्यांमध्ये विकतात.