Tuesday, September 02, 2025 12:19:34 AM

उन्हाळ्यात कुंडीतली रोपं सुकतायत? कांद्याच्या सालीचा असा करा वापर, हिरवीगार छान होतील

उन्हाळ्यामध्ये घरात कांद्याचा वापर वाढतो. काही लोक तो सॅलडमध्ये खातात, तर काही उष्णतेपासून बचाव करण्यासाठी तो सोबत ठेवतात. पण, कांद्याची साल सहसा फेकून दिली जाते. ही साल झाडांसाठी खूप उपयोगी आहे.

उन्हाळ्यात कुंडीतली रोपं सुकतायत कांद्याच्या सालीचा असा करा वापर हिरवीगार छान होतील

Use of Onion Peels For Plants: उन्हाळ्यात माणसांना जसा उष्णतेचा त्रास होतो, तशाच पद्धतीने झाडांवर, प्राण्यांवरही परिणाम होतो. आपण घराच्या आसपास कुंडीमध्ये रोपं लावलेली असतात. ती भरदुपारी तीव्र उन्हात सुकल्यासारखी होतात. तर, या रोपांना हिरवंगार ठेवण्यासाठी काय करावं? यावर कांद्याची साल उपयुक्त ठरू शकते.

कांद्याचा गुणधर्म थंड असतो, हे आपणा सर्वांना माहीत आहेच. उष्णतेच्या विविध समस्यांवर कांदा गुणकारी आहे.त्यामुळे उन्हाळ्यात कच्चा कांदा जास्त प्रमाणात खाल्ला जातो. याच्या साली मात्र, काही कामच्या नाहीत, असा विचार करून आपण त्या टाकून देतो. मात्र, वनस्पतींवर या कांद्याच्या सालींचा खूप चांगला परिणाम होतो. वनस्पतींना हिरवंगार ठेवण्यासाठी कांद्याच्या सालीचं खत अत्यंत उपयुक्त आहे. ही साल पाण्यात 24 तास भिजवून त्याचं द्रावण तयार केलं जातं. हे द्रावण 1 लिटर पाण्यात 10-20 ग्रॅम मिसळून वनस्पतींना घालावं. याच्या फायदा रोपांना नक्कीच होईल. रोपं उन्हाळ्यात ताजीतवानी आणि टवटवीत होतील.

हेही वाचा - पोळी जाड खावी की पातळ? आरोग्यासाठी कोणती जास्त चांगली?

कांद्याची सालं झाडांसाठी खत म्हणून वापरली जाऊ शकतात
कांद्याची साल घरी लावलेल्या लहान-मोठ्या झाडांसाठी आणि कुंडीतील रोपट्यांसाठी खत म्हणून वापरली जाऊ शकते. यामुळे झाडे थंड राहतात आणि उन्हाळ्यात कमी पाणी मिळाल्यावरही झाडांमध्ये पाण्याची कमतरता भासत नाही. याशिवाय, खूप उष्णतेतही झाडे हिरवीगार आणि निरोगी राहतात. हा उपाय खूप फायदेशीर ठरत आहे. तेव्हा, याचा वापर तुम्हीही करून पाहा आणि इतरांनाही नक्की सांगा. या पद्धतीने आपण आपल्या घराशेजारची बाग आणि इतर झाडे जतन करू शकतो. 

असे तयार करा पाणी
कांद्याची साल एका ग्लास पाण्यात टाका आणि 24 तास तशीच ठेवा. यानंतर, 1 लिटर पाण्यात हे कांद्याच्या सालीचे पाणी 10-20 ग्रॅम मिसळा आणि ते झाडांना घाला. यामुळे झाडे नेहमी हिरवीगार राहतात. कांद्यामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असते, जे मातीला निरोगी ठेवतात आणि झाडे मजबूत करतात.

कचरा कमी होण्यासाठीदेखील ही पद्धत उपयुक्त
गावांच्या तुलनेत लहान-मोठ्या शहरांमध्ये कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावते. काही ठिकाणी नगरपालिका, महापालिकेकडून कचरागाडीतून कचरा गोळा केला जातो. मात्र, अशा पद्धतीने कांद्याच्या साली, फळांच्या साली, भाज्यांची देठं, वापर न झालेल्या आणि सुकलेल्या भाज्या यांचं आपण घरच्या घरी खत बनवून वापरू शकतो. यामुळे घरच्या झाडांना आणि रोपांना मोफत खत मिळण्यासोबतच आपण आपल्या घरच्या कचऱ्याचं घरच्या घरी व्यवस्थापन करू शकतो. यामुळे पर्यावरण चांगले राहण्यासही हातभार लागेल.

हेही वाचा - दुधाचा चहा पिणे चांगले की वाईट? महिनाभर नाही घेतला तर काय होईल?


सम्बन्धित सामग्री