मुंबई: बृहमुंबई महानगरपालिकेने एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतलाय. आता तुम्ही जर उघड्यावर कचरा जाळत असाल तर तुम्हाला जास्तीचा दंड भरावा लागणारे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना आता 100 रुपयांऐवजी एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. उघड्यावर कचरा जाळल्यामुळं वायू प्रदूषणासह पर्यावरण आणि आरोग्याचे गंभीर धोके निर्माण होतात. त्यामुळं नागरिकांना याची जाणीव व्हावी म्हणून महानगरपालिकेने दंडाच्या रकमेत 10 पटींनी वाढ केली आहे. दिनांक 1 एप्रिल 2025 पासून त्याची अंमलबजावणी केली जाईल. तसेच उघड्यावर कचरा जाळण्याचे प्रकार रोखण्याचे विभाग कार्यालय (वॉर्ड) स्तरावर पथक तयार करण्यात आले आहे. या पथकात घन कचरा व्यवस्थापन विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षक, उपद्रव शोधक (एनडी स्टाफ) आणि मुकादम अशा तिघांचा समावेश राहणार आहे.
हेही वाचा: गाण्यातून ठाकरेंवर साधला निशाणा
उघड्यावर कचरा जाळण्याचे तोटे:
उघड्यावर कचरा जाळणे ही एक गंभीर समस्या आहे, ज्यामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. याचे तोटे पुढीलप्रमाणे आहेत:
वायुप्रदूषण:
कचरा जाळल्यामुळे हानिकारक वायू जसे की कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड्स आणि डायऑक्सिन्स वातावरणात सोडले जातात. यामुळे वायुप्रदूषण वाढते आणि हवेत विषारी रसायने मिसळतात.
आरोग्यावर परिणाम:
श्वसनाच्या समस्या, दमा, फुफ्फुसांचे आजार, कर्करोग, आणि हृदयरोगांचा धोका वाढतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाच्या समस्या असलेले लोक विशेषतः प्रभावित होतात. माती आणि पाण्याचे
प्रदूषण:
जळालेल्या कचऱ्यातील राख, रसायने आणि धातू माती आणि पाण्यात मिसळून त्याचे प्रदूषण करतात. यामुळे शेतीच्या उत्पादनक्षमतेवर वाईट परिणाम होतो.
प्राण्यांना धोका:
प्राण्यांना विषारी धूर आणि राखेमुळे हानी होते. प्लास्टिक आणि इतर हानिकारक पदार्थ जाळल्यास प्राण्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
हवामान बदलावर परिणाम:
कार्बन डायऑक्साईडसारखे हरितगृह वायू हवामान बदलास कारणीभूत ठरतात. यामुळे जागतिक तापमानवाढ (Global Warming) होते.
पर्याय:
कचरा वर्गीकरण करून पुनर्वापर (Recycling) करा. कंपोस्टिंगद्वारे ओला कचरा खतामध्ये रुपांतरित करा. स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी नियमांचे पालन करा.