मराठा आरक्षण आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही मनोज जरांगेंची प्रमुख मागणी आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी नेत्यांची दोन तासांपासून मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
मराठा आणि कुणबी एक, हा मूर्खपणा असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यासाठी, हायकोर्टाचा संदर्भही देण्यात आला. ओबीसी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी नेत्यांची काय भूमिका असणार? याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेतून दिली.