Monday, September 01, 2025 06:45:35 PM

Mumbai-Ahmedabad Bullet Train: भारताची पहिली हाय-स्पीड बुलेट ट्रेन; मुंबई ते अहमदाबाद 508 किमीचा प्रवास आता फक्त 3 तासांत

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सध्या या प्रोजेक्टचे काम अंतिम टप्प्यात आहे.

mumbai-ahmedabad bullet train भारताची पहिली हाय-स्पीड बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद 508 किमीचा प्रवास आता फक्त 3 तासांत

Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सध्या या प्रोजेक्टचे काम अंतिम टप्प्यात आहे आणि 2027-28 मध्ये ही ट्रेन प्रवाशांसाठी सुरु होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि अहमदाबाद या दोन मोठ्या शहरांना फक्त तीन तासांत जोडणारी ही बुलेट ट्रेन प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकणार आहे.

सध्याच्या सहा ते सात तासांच्या प्रवासाच्या तुलनेत बुलेट ट्रेन 508 किमी अंतर फक्त तीन तासांत पार करेल. या मार्गावर महाराष्ट्रात 156 किमी, गुजरातमध्ये 348 किमी आणि दादर नगर हवेलीमध्ये 4 किमीचा प्रवास असेल. या उच्च-वेगाच्या ट्रेनसाठी जपानच्या शिंकनसन टेक्नॉलॉजीचा वापर केला जात आहे, ज्यामुळे प्रवास वेगवान आणि आरामदायक होणार आहे.

हेही वाचा: Vaishno Devi Yatra: भाविकांना मोठा दिलासा; वैष्णोदेवी यात्रेसाठी बुकिंग रद्द करणाऱ्यांना परत मिळणार पूर्ण पैसे

बुलेट ट्रेनचे स्थानक

मुंबई-अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन 12 स्थानकांवर थांबणार आहे. या स्थानकांची यादी खालीलप्रमाणे:

-मुंबई (अंडरग्राऊंड)

-ठाणे

-विरार

-बोहिसर

-वापी

-बिलिमोरा

-सूरत

-भरूच

-वडोदरा

-आणंद

-अहमदाबाद

-साबरमती

मुंबईतील स्थानके अंडरग्राऊंड असतील, तर 5058 किमीच्या मार्गावर 465 किलोमीटर लंबा वायाडक्ट असेल आणि 9.82 किमी लांब ब्रिजेस या मार्गावर तयार केले जात आहेत. डोंगर कटिंग आणि भोगद्यातून मार्ग पार करत बुलेट ट्रेन प्रवास गतीमान होईल.

हेही वाचा: SCO Conference In China: 'दहशतवादावर दुहेरी निकष स्वीकारार्ह नाहीत...'; चीनमधील एससीओ परिषदेत पंतप्रधान मोदींचे महत्त्वाचे वक्तव्य

प्रवासाचा अनुभव आणि तिकीट दर

प्रवाशांसाठी हा प्रवास अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे. तिकीट दर अंदाजे 3,000 ते 5,000 रुपये दरम्यान राहणार आहेत. प्रवाशांना आरामदायक, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा प्रवास अनुभवता येईल.

प्रोजेक्ट वेळापत्रक

2026: सूरत ते बिलिमोरा दरम्यान 50 किमी चाचणी रूटवर बुलेट ट्रेनची चाचणी सुरू होणार आहे.

2027: साबरमती-वापी मार्गावर चाचणी चालवली जाणार आहे.

2028-29: वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ते साबरमती मार्गावर संपूर्ण ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी एकूण खर्च 15 बिलियन डॉलर इतका आहे. या प्रोजेक्टमुळे फक्त प्रवासाची गती वाढणार नाही, तर महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये आर्थिक आणि सामाजिक दृष्टीनेही मोठा फायदा होणार आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट फक्त प्रवाशांसाठी नव्हे, तर उद्योग, व्यापार आणि पर्यटनासाठी देखील एक मोठा गेम-चेंजर ठरणार आहे. 2027-28 मध्ये सुरू झाल्यावर हा प्रवास फक्त तीन तासांत पूर्ण होणार आहे, जे प्रवाशांसाठी मोठी सोय ठरणार आहे.

 


सम्बन्धित सामग्री