Afghanistan Earthquake Updates: रविवारी, 31 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा अफगाणिस्तानमध्ये भूकंपाची भीषण घटना घडली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली. पाकिस्तान सीमेजवळील पूर्व अफगाणिस्तानमध्ये झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.0 इतकी होती. तालिबान सरकारच्या माहितीनुसार, या भूकंपात 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, बहुतेक मृत्यू दुर्गम कुनार प्रांतात झाले आहेत. याशिवाय हजारो लोक जखमी झाले आहेत.
स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री कुनार आणि नांगरहार प्रांतातील नागरिकांना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. पर्वतीय भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये घरांचे नुकसान आणि अन्य आर्थिक नुकसान झाल्याचे वृत्त आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, भूकंपाचे केंद्र जलालाबाद शहराच्या पूर्वेस 27 किलोमीटर अंतरावर असून, जमिनीपासून फक्त 8 किलोमीटर खोलीवर होते. सुमारे 20 मिनिटांनंतर, त्याच प्रांतात दुसरा भूकंपही झाला, ज्याची तीव्रता 4.5 होती.
हेही वाचा - Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला 6.3 तीव्रतेचा भूकंप; दिल्ली-एनसीआरपर्यंत जाणवले भूकंपाचे धक्के
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या विनाशकारी घटनेबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, भारत या गरजेच्या वेळी मदत करेल. पीडितांच्या कुटुंबांविषयी आमच्या संवेदना आहेत आणि जखमींच्या जलद पुनर्प्राप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो.
हेही वाचा - Army Helicopter Crash In Pakistan: पाकिस्तानात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, 5 जणांचा मृत्यू
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही X वरील पोस्टद्वारे भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल खूप दुःख झाले आहे. भारत बाधित लोकांना सर्व शक्य ती मानवीय मदत देण्यासाठी तयार आहे.