Hair Fall Astrology: आजच्या धकाधकीच्या जीवनात केसगळती ही एक सामान्य समस्या झाली आहे. पुरुष असो वा महिला, वयाच्या कुठल्याही टप्प्यावर केस गळण्याची तक्रार ऐकायला मिळते. यामागे अनेक कारणं असू शकतात प्रदूषण, आहारातील कमतरता, हार्मोनल बदल पण तुम्हाला हे माहित आहे का, की तुमच्या कुंडलीतील ग्रहसुद्धा यामागे जबाबदार असू शकतात?
ज्योतिषशास्त्रात शरीराच्या प्रत्येक भागाचा संबंध विशिष्ट ग्रहाशी जोडला गेलेला असतो. केसांचं आरोग्यही त्याला अपवाद नाही. विशेषतः बुध, राहू आणि शनी हे ग्रह केसांच्या स्थितीवर थेट प्रभाव टाकतात.
राहू ग्रहाचा प्रभाव
राहू हा छाया ग्रह आहे आणि तो भ्रम, मानसिक तणाव, अनिश्चितता आणि अपयशाशी संबंधित मानला जातो. जर राहू ग्रह तुमच्या कुंडलीत धनू किंवा वृश्चिक राशीत असेल आणि त्याची दृष्टि सूर्यावर असेल, तर केसगळती थांबत नाही. सूर्य हा आत्मा आणि आरोग्याचा कारक असल्यामुळे त्यावर राहूचा नकारात्मक प्रभाव पडल्यास शरीरात उष्णता वाढते, मेंदूतील ताण वाढतो आणि केस गळण्यास सुरुवात होते.
उपाय: राहूला बलवत्तर करण्यासाठी केस झाकून ठेवावेत, म्हणजे डोक्यावर सतत टोपी, स्कार्फ किंवा उबदार रूमाल ठेवावा. यामुळे उष्णतेचा परिणाम कमी होतो.
शनी ग्रह आणि केसगळती
शनी हा कर्म, न्याय आणि विलंब यांचा प्रतिनिधी मानला जातो. जर शनी आठव्या किंवा द्वादश भावात असेल, तर त्याचा नकारात्मक प्रभाव डोक्याच्या त्वचेवर आणि केसांच्या मुळांवर दिसू लागतो. यामुळे केस कोरडे, निर्जीव होत जातात आणि हळूहळू गळू लागतात.
उपाय: शनी ग्रह शांत करण्यासाठी शनिवारच्या दिवशी काळ्या वस्त्रांचे दान करा, गरीबांना तेल, उडीद डाळ, लोखंडी वस्तू द्या. याशिवाय, कडुलिंबाचं तेल केसांना नियमित लावल्याने शनी अनुकूल राहतो.
बुध ग्रह आणि मेंदूचा ताण
बुध ग्रह मेंदू, संवाद, विचार, निर्णय आणि तर्कशक्ती यांचा कारक आहे. जर बुध ग्रह कमजोर असेल तर सतत विचार, चिंता, मानसिक थकवा यामुळे केसांचा पोषण तुटतो आणि गळती वाढते.
उपाय: बुध बळकट करण्यासाठी हिरव्या वस्तूंचे सेवन करा (पालक, कोथिंबीर), बुधवारी श्रीगणेशाची उपासना करा आणि हरित वस्त्र धारण करा.
थोडक्यात काय लक्षात ठेवाल?
ज्योतिषशास्त्रात केवळ उपचार नव्हे तर ग्रहांचे संतुलन महत्त्वाचे असते.राहू, शनी आणि बुध ग्रहांचा केसांवर खोल परिणाम होतो.योग्य उपाय केल्यास केवळ केसगळती नाही तर मानसिक शांतीही मिळते.
आपण कितीही आयुर्वेदिक तेलं वापरली, औषधं घेतली किंवा ट्रीटमेंट केली, पण जर मूळ कारण ग्रहदोष असेल तर त्यावर आध्यात्मिक उपाय हेच अधिक फायदेशीर ठरतात. म्हणूनच, केसगळतीची खरी कारणं समजून, त्यावर योग्य उपाय करून तुम्ही तुमचे केस पुन्हा दाट आणि निरोगी बनवू शकता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)