Effect of Watching Reels on The Brain : हल्ली सोशल मीडियावर रील्स पाहण्याचा छंद सर्व वयोगटातील लोकांमध्ये वेगाने वाढला आहे. याला काहीसे रील्स पाहण्याचे वेड असेही म्हणता येईल.. काही सेकंदांचे व्हिडिओ पाहण्यासाठी कमी वेळ लागत असला तरी, त्याचा मेंदूवर मोठा परिणाम होत आहे. शॉर्ट-व्हिडिओंचे व्यसन हा जागतिक सार्वजनिक आरोग्यासाठी धोका आहे. चीनमधील वापरकर्ते दिवसाला सरासरी 151 मिनिटे व्हिडिओ पाहतात आणि 95.5 टक्के इंटरनेट वापरकर्त्यांना त्याचे व्यसन लागले आहे.
मानसशास्त्र तज्ज्ञांचे असे मत आहे की, जास्त रील्स पाहण्यामुळे केवळ लक्ष, झोप आणि मानसिक आरोग्यावरच परिणाम होत नाही तर नैराश्य देखील वाढते. यांच्या मते, शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ लक्ष, कौशल्य आणि अल्पकालीन स्मरणशक्तीवर देखील नकारात्मक परिणाम करू शकतात. न्यूरोलॉजिस्ट आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सतत रील्स पाहणे मेंदूच्या कार्यावर त्याच प्रकारे परिणाम करू शकते, जसे अल्कोहोल घेतल्यानंतर होते.
हेही वाचा - Health Tips : 'हार्ट अटॅकला चुकून गॅसची समस्या समजू नका,' जाणून घ्या, कसा ओळखायचा फरक
तज्ज्ञांच्या मते, लहान व्हिडिओ जलद गतीने चालतात, त्यामुळे मेंदू त्यांच्यावर प्रक्रिया करण्यात जड होतो. लहान व्हिडिओ कमीत कमी प्रयत्नात उच्च डोपामाइन अनुभव देतात, ज्यामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. कालांतराने, त्याचा प्रभाव वाढू लागतो आणि नंतर त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
खरं तर, रील्सचे स्वरूप लहान आणि जलद असते, ज्यामुळे मेंदूला दर काही सेकंदांनी नवीन माहिती किंवा दृश्ये मिळतात. यामुळे मेंदूला त्वरित समाधानाची सवय होते. ही प्रक्रिया दीर्घकाळात लक्ष केंद्रित करण्याची आणि एकाच कामात टिकून राहण्याची क्षमता कमी करू शकते. यामुळे मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सवर परिणाम होऊ शकतो, जो प्राप्त माहितीच्या आधारे आपले विचार, वर्तन आणि भावनांचे मार्गदर्शन करतो.
रील्स पाहणे आणि दारू पिणे यात काय समानता आहे?
न्यूरोलॉजिस्टच्या मते, जेव्हा आपण रील्स पाहतो तेव्हा मेंदूच्या रिवॉर्ड सेंटरला वारंवार डोपामाइन बूस्ट्स मिळतात. हे तेच न्यूरोट्रांसमीटर आहे, जे आनंद आणि समाधानाची भावना निर्माण करते. जेव्हा कोणी व्यक्ती दारू पिते, तेव्हा तेच डोपामाइन सोडले जाते. जेव्हा आपण सतत रील्स स्क्रोल करतो, तेव्हा मेंदूला या डोपामाइन हिटचे व्यसन लागू शकते, ज्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा नवीन रील्स पाहण्याची इच्छा होते. ज्याप्रमाणे दारू पिल्याने वारंवार मद्यपानाचे व्यसन लागू शकते. तसेच, दारूचा प्रभाव उतरल्यानंतर नैराश्य येते. त्याच प्रमाणे वारंवार रील्स पाहिल्यामुळेही हळूहळू नैराश्याची भावना येते.
हेही वाचा -Diabetes : हाय ब्लड शुगर आहे? मग या चार भाज्या खा.. मधुमेह सामान्य पातळीवर राहील
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)