Monday, September 01, 2025 02:46:04 AM

उपवासासाठी परफेक्ट साबुदाणा खीर! या 5 सोप्या टिप्सने बनवा स्वादिष्ट आणि मलाईदार खीर

खीर हा भारतीय सण आणि पूजांमध्ये हमखास बनणारा गोड पदार्थ आहे. तांदळाची खीर सर्वात लोकप्रिय असली तरी, साबुदाणा खीरलाही विशेष स्थान आहे,

उपवासासाठी परफेक्ट साबुदाणा खीर या 5 सोप्या टिप्सने बनवा स्वादिष्ट आणि मलाईदार खीर

खीर हा भारतीय सण आणि पूजांमध्ये हमखास बनणारा गोड पदार्थ आहे. तांदळाची खीर सर्वात लोकप्रिय असली तरी, साबुदाणा खीरलाही विशेष स्थान आहे, विशेषतः उपवासाच्या काळात. लहान-लहान साबुदाणा मोती हे स्टार्चने भरलेले असतात, त्यामुळे उपवासात शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. जर तुम्हाला साबुदाणा खीर परफेक्ट टेक्शरमध्ये बनवायची असेल, तर हे 5 सोपे टीप्स तुमच्यासाठी!

साबुदाणा म्हणजे काय?

साबुदाणा म्हणजे टॅपिओका पर्ल्स किंवा सागो, जो कासावा वनस्पतीच्या मुळांपासून मिळवला जातो. हा नैसर्गिकरीत्या ग्लूटेन-फ्री असून, गहू किंवा ग्लूटेनला अॅलर्जी असलेल्या लोकांसाठी उत्तम पर्याय आहे. साबुदाणा उपवासात प्रामुख्याने खिचडी, वडा आणि चिल्ला बनवण्यासाठी वापरला जातो.

हेही वाचा : त्र्यंबकेश्वरात महाशिवरात्री उत्साहात! नागा साधूंनी केले कुशावर्त तीर्थात स्नान

परफेक्ट साबुदाणा खीर बनवण्यासाठी 5 सोपे टीप्स:

1) साबुदाणा व्यवस्थित धुवा
साबुदाणा स्वच्छ धुणे फार महत्त्वाचे आहे. यामुळे अतिरिक्त स्टार्च निघून जातो आणि खीर बनवताना तो चिकट होत नाही.

2) योग्यप्रकारे भिजवा
धुवून झाल्यावर 2 ते 3 तास पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे साबुदाणा लवकर आणि मऊ शिजतो.

3) खीरची योग्य कन्सिस्टन्सी ठेवा
साबुदाणा खीर थोड्या वेळाने घट्ट होते. जर खीर जास्त घट्ट झाली, तर सर्व्ह करण्यापूर्वी थोडे दूध घालून परत मिक्स करा.

4) संपूर्ण फुल क्रीम दूध वापरा
फुल क्रीम दूध वापरल्यास खिरीला चविष्ट बनते आणि मलाईदार चव येते. त्यामुळे शक्यतो पातळ दूध टाळा.

5) स्वादासाठी खास फ्लेवर्स द्या
खिरीची चव आणखी वाढवण्यासाठी केशर आणि वेलदोड्याची पूड घालायला विसरू नका. यामुळे खिरीला अप्रतिम सुगंध आणि स्वाद येतो. 

हेही वाचा : महाशिवरात्री उत्साहात! घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांचा महापूर

साबुदाणा खीर रेसिपी

साहित्य:

  • ½ कप साबुदाणा
  • ½ लिटर दूध
  • ¼ कप साखर
  • 4-5 वेलदोडे (जाडसर कुटून)
  • 8-10 बदाम (स्लाइस करून)
  • 8-10 काजू (चिरून)
  • 10-12 मनुका
  • 1 टिस्पून तूप

कृती:

  1. साबुदाणा स्वच्छ धुऊन 30 मिनिटे भिजत ठेवा.
  2. एका भांड्यात दूध गरम करायला ठेवा. उकळी आल्यावर भिजवलेला साबुदाणा घालून मध्यम आचेवर शिजवा.
  3. साबुदाणा पारदर्शक झाल्यावर साखर, वेलदोडा पूड आणि सुकामेवा घाला.
  4. मंद आचेवर 5-7 मिनिटे शिजवा आणि मधूनमधून हलवत राहा.
  5. खीर घट्ट झाली की गॅस बंद करा आणि गरम किंवा गारसर सर्व्ह करा.

टीप:

  • गोड कमी-जास्त आवडीनुसार बदलू शकता. 

तर मग, यंदाच्या महाशिवरात्रीला किंवा उपवासाच्या दिवशी ही खास साबुदाणा खीर करून पहा आणि परिपूर्ण चवीचा आनंद घ्या!


सम्बन्धित सामग्री