Wednesday, August 20, 2025 12:44:51 PM

जाणून घ्या व्हाट्सअँपचे हे ३ नवीन फीचर्स

WhatsApp घेऊन आलं आहे 3 नवीन updates

जाणून घ्या व्हाट्सअँपचे हे ३ नवीन फीचर्स

गेल्या एका दशकात WhatsApp जगातील सर्व 'स्मार्टफोन यूजर्सच्या' जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. बघायला गेलं तर WhatsApp ला अजून कोणताच अँप तोड देऊ शकला नाही आहे. WhatsApp चे एक महत्वाचे गुणवैशिष्ट्य म्हणजे WhatsApp आपल्या वापरकर्त्यांना चांगला user experience  देणं. हे करण्यासाठी WhatsApp नेहमी काही न काही नवीन updates  घेऊन येत असतं. अश्याच 3 नवीन updates WhatsApp घेऊन आलं आहे.

  1. Photo and Video Call Features - आता तुम्ही Video Call करताना वेगवेगळ्या प्रकारचे filters लावू शकतात. या feature मुळे तुम्ही background देखील बदलू शकतात. हा feature पाहली Instagram आणि Google Meet अँपमध्ये उपलब्ध होता आता WhatsApp ने देखील समाविष्ट केला आहे.

  2. Custom Contact List- WhatsApp ने हल्लीच search bar च्या खाली Unread, Favorites आणि Groups असे तीन features दिलेले. त्याचा सोबत आता Custom contact list option आला असून त्यात तुम्ही groups किंवा save केलेले contacts add करू शकता आणि Unread, Favorites आणि Groups हे options delete देखील करू शकतात.

  3. Meta AI - Meta AI हे आता अजून हुशार झालेले आहे. Meta AIमध्ये तुम्ही आता photo generate  करू शकतात. तसेच तुम्हाला कोणत्याही विशेष विषयवार Instagram रील हवं असेल तर ते देखील आता तुम्ही search करू शकाल. व्हाट्सअँप ने अजून देखील काही फीचर्स आणले आहेत आणि व्हाट्सअँप अजून कोणते नवीन फीचर्स आणेल ह्यावर संगळ्यांच लक्ष असेल 


सम्बन्धित सामग्री