Wednesday, September 03, 2025 09:23:12 PM

गुढीपाडवानिमित्त घरच्या घरी बनवा केशरयुक्त शुगर - फ्री श्रीखंड

अनेकांना शुगरची समस्या असल्यामुळे श्रीखंड खाणे बहुतांश टाळतात. तर आज आपण जाणून घेणार आहोत श्रीखंडची केशरयुक्त शुगर-फ्री रेसिपी.

गुढीपाडवानिमित्त घरच्या घरी बनवा केशरयुक्त शुगर - फ्री श्रीखंड

सणानिमित्त घराघरात श्रीखंड बनवला जातो. श्रीखंडमध्ये मोठ्या प्रमाणात साखर वापरला जातो. जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतो. मोठ्या प्रमाणात साखरेचे सेवन केल्यामुळे शुगर आणि बऱ्याच समस्या उद्भवतात. अनेकांना शुगरची समस्या असल्यामुळे श्रीखंड खाणे बहुतांश टाळतात. त्यामुळे, अनेकांच्या मनात विचार येतो की, नेमकं श्रीखंड खायचं तरी कसं? तर आज आपण जाणून घेणार आहोत श्रीखंडची केशरयुक्त शुगर-फ्री रेसिपी. 

 

साहित्य:

3/4 कप ताजे कमी चरबीयुक्त दही, 
1/4 टीस्पून केशरच्या धाग्या,
1/4 टीस्पून वेलची पावडर
1 टेबलस्पून कोमट कमी चरबीयुक्त दुध


पद्धत:

एक लहान भांड्यामध्ये दूध आणि केशर यांना एकत्रित करा, मिसळा आणि 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवा. 

एका खोल वाटीमध्ये दूध आणि केशर यांच्या मिश्रणासोबत उर्वरित सर्व साहित्य एकत्रित करा आणि व्हिस्क वापरून मिसळा. 

या मिश्रणाला कमीत कमी 2 तास फ्रीजमध्ये ठेवा. 

त्यानंतर, थंडगार सर्व्ह करा. 


उपयुक्त टीप:

साधारण 1 आणि 1/2 कप ताजे आणि कमी चरबीयुक्त दही मलमलच्या कापडामध्ये 1 तास टांगल्यास 3/4 कप कमी चरबीयुक्त दही मिळते. 


महत्वाची टीप:

मधुमेहांसाठी ही रेसिपी कमी प्रमाणात खावे अशी शिफारस केली जाते. त्यासोबत, मधुमेह लोकांनी केशरयुक्त शुगर - फ्री श्रीखंड याचे नियमित सेवन करणे टाळावे. 

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री