मुंबई: येत्या शनिवारी देशभरात रक्षाबंधन साजरा होणार आहे. या दिवशी अनेक बहिणी साजश्रुंगार करतात. यासह, बहिणी त्यांच्या फॅशनमध्ये कोणतीही कसर सोडत नाही. जर तुम्ही सुद्धा रक्षाबंधनाच्या दिवशी पारंपारिक वेशभूषा करणार असाल तर, योग्य हेअरस्टाईल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचं कारण म्हणजे, हेअरस्टाईल केल्याने त्याचा परिणाम तुमच्या लूकवर होतो. कोणतीही हेअरस्टाईल करण्यापूर्वी काही गोष्टी खूप महत्त्वाचे आहे, ते म्हणजे जी हेअरस्टाईल तुम्ही करणार आहात, ती हेअरस्टाईल बनवण्यासाठी साधारणत: किती वेळ लागतो? ती हेअरस्टाईल करणे कठीण आहे की सोपे? विशेष बाब म्हणजे, ही हेअरस्टाईल तुमच्या पोशाखाशी जुळते की नाही? या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, आज आम्ही तुमच्यासाठी बॉलिवूड हेअरस्टाईल घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्ही खूप सुंदर दिसाल.
फिशटेल वेणी हेअरस्टाईल
जर तुम्हाला उन्हाळ्यात केस उघडे ठेवायचे नसतील, तर साइड ब्रेड हा एक उत्तम आणि आरामदायी पर्याय आहे. पारंपारिक पोशाखांसह ही हेअरस्टाईल आणखी सुंदर दिसेल. ते बनवण्यासाठी, सर्वप्रथम साईड पार्टीशन बनवा, नंतर क्राउन सेक्शनमधून वेणी बनवण्यासाठी सुरूवात करा. त्यानंतर, केस बाजूला घ्या एक सैल फिशटेल वेणी बनवा. रक्षाबंधनासाठी ही एक अतिशय सुंदर आणि साधी हेअरस्टाईल आहे.

ट्विस्टेड हेअरस्टाईल
जर तुम्हाला तुमच्या केसांना उघडे ठेवायचे असतील, तर ट्विस्टेड हेअरस्टाईल अप्रतिम असेल. ही हेअरस्टाईल लवकर तयार केली जाते. सर्वप्रथम केसांचे मिडल पार्टीशन करा, त्यानंतर दोन्ही बाजूंनी थोडे-थोडे केस घेऊन त्याला ट्विस्ट करा. आता हा ट्विस्ट केलेला भाग तुम्ही क्लिपच्या मदतीने सुरक्षित करा. तुमची सुंदर हेअरस्टाईल तयार आहे.

गजरा हेअरस्टाईल
रक्षाबंधनासारख्या पवित्र सणादिवशी गजरा घाल्यापेक्षा चांगले काय असू शकते? तर तुम्ही गजरा हेअरस्टाईल देखील करू शकता. यात तुम्हाला केस उघडे दिसतील आणि वेणीही मिळेल. ही हेअरस्टाईल बनवणे सोपे आहे, कारण तुम्हाला फक्त बाजूची वेणी बनवावी लागेल आणि सुंदर गजरा घालावा लागेल.
