Wednesday, August 20, 2025 10:38:14 AM

Independence Day 2025: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कार किंवा बाईकवर तिरंगा लावण्यापूर्वी 'हे' नियम वाचा; अन्यथा होऊ शकतो तुरुंगवास

तिरंगा हा केवळ कापडाचा तुकडा नसून आपल्या देशाच्या गौरव आणि अभिमानाचे प्रतीक आहे. त्यामुळे भारत सरकारने ‘भारतीय ध्वज संहिता’ अंतर्गत राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखण्यासाठी स्पष्ट नियम घालून दिले आहेत.

independence day 2025 स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कार किंवा बाईकवर तिरंगा लावण्यापूर्वी हे नियम वाचा अन्यथा होऊ शकतो तुरुंगवास

Independence Day 2025: सध्या सर्वत्र स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू आहे. बाजारपेठांमध्ये तिरंगा विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच कार्यालये सजवली जात आहेत आणि अनेकजण आपल्या वाहनांवर राष्ट्रध्वज लावण्याची तयारी करत आहेत. मात्र देशभक्ती व्यक्त करण्याच्या या उत्साहात कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. तिरंगा हा केवळ कापडाचा तुकडा नसून आपल्या देशाच्या गौरव आणि अभिमानाचे प्रतीक आहे. त्यामुळे भारत सरकारने ‘भारतीय ध्वज संहिता’ अंतर्गत राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखण्यासाठी स्पष्ट नियम घालून दिले आहेत. या नियमांचे पालन केल्याने राष्ट्रीय प्रतीकाचा आदर अबाधित राहतो आणि त्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत नाही.

उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा - 
जर तुम्ही कार, बाईक किंवा कोणत्याही वाहनावर तिरंगा लावण्याचा विचार करत असाल, तर ध्वज संहितेतील तरतुदी समजून घेणे गरजेचे आहे. ध्वज कधीही जमिनीला स्पर्श करू नये किंवा वाहनाखाली वाकू नये. प्लास्टिकच्या तिरंग्याचा वापर पूर्णपणे बंदीस्त आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

हेही वाचा - Independence Day 2025: स्वातंत्र्य दिनाला लालकिल्ल्यावर पंतप्रधान मोदींचे लाईव्ह भाषण ऐकण्यासाठी 'असे' बुक करा सीट

काय आहेत नियम? 

-तिरंगा सदैव स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत असावा.
- फाटलेला, मळकट किंवा फिका पडलेला ध्वज फडकावणे टाळावे.
- ध्वज वाहनाच्या अशा ठिकाणी ठेवू नये जिथे तो खाली पडू शकतो किंवा पायाखाली येऊ शकतो.
- सजावटीसाठी, कपड्यांच्या स्वरूपात किंवा जाहिरातींसाठी तिरंग्याचा वापर निषिद्ध आहे.
- रात्री ध्वज फडकावला जात असल्यास योग्य प्रकाशयोजना असणे आवश्यक आहे.

हेही वाचा - Best Independence Day Activities for Office: ऑफिसमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी ट्राय करा 'या' खास आयडिया!

देशभक्ती आणि जबाबदारी
देशभक्तीची भावना व्यक्त करणे नक्कीच अभिमानास्पद आहे, परंतु ती योग्य मार्गाने व्यक्त होणे महत्त्वाचे आहे. तिरंगा फडकवताना जर आपण नियमांचे पालन केले नाही, तर आपण केवळ कायद्याचे उल्लंघन करत नाही तर राष्ट्रीय सन्मानालाही धक्का पोहोचवतो. त्यामुळे 15 ऑगस्ट किंवा इतर कोणत्याही प्रसंगी तिरंगा लावताना, त्याचे महत्त्व लक्षात ठेवून आणि ध्वज संहिता पाळूनच हा उत्सव साजरा करावा.


सम्बन्धित सामग्री