Heart Attack In Teenagers: आजच्या धावपळीच्या आणि असंतुलित जीवनशैलीमुळे हृदयविकार केवळ वयस्करांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. आता टीनएजर्स, म्हणजेच किशोरवयीन मुलांमध्येही हार्ट अटॅकसारख्या गंभीर समस्या दिसू लागल्या आहेत. चुकीचा आहार, कमी शारीरिक हालचाल, धूम्रपान, ड्रग्सचा वापर आणि अतिप्रमाणात ताणतणाव या सवयींमुळे लहान वयात हृदयावर ताण येतो. याकडे दुर्लक्ष केल्यास परिणाम अत्यंत गंभीर होऊ शकतात.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, किशोरवयीन मुलांमध्ये हृदयाच्या समस्या होण्याची शक्यता कमी असल्यामुळे पालक आणि मुलंही लक्षणांकडे गंभीरतेने पाहत नाहीत. त्यामुळे उपचार सुरू होण्यात उशीर होतो आणि स्थिती गंभीर होते. त्यामुळे या वयात हार्ट अटॅकची चिन्हं ओळखणं आणि योग्य वेळी उपाय करणं अत्यंत आवश्यक आहे.
हेही वाचा: डोळ्यांसमोर धूसर, अस्पष्ट दिसतंय? या 4 आयुर्वेदिक पद्धतींचा अवलंब करा; एका महिन्यात फरक जाणवेल
टीनएजर्समध्ये दिसणारी हार्ट अटॅकची 6 लक्षणं
1. छातीत वेदना किंवा जडपणा: छातीत मध्यभागी दाब, घट्टपणा किंवा ओझे जाणवणं हे सर्वात कॉमन लक्षण आहे. ही भावना काही मिनिटे टिकू शकते. हलकी किंवा थोड्यावेळाने कमी होणारी वेदना असली तरी ती दुर्लक्ष करू नये.
2. श्वास घेण्यास त्रास: अचानक श्वास फुलणे किंवा पुरेसा श्वास न मिळाल्यासारखं वाटणं. हे कोणत्याही शारीरिक श्रमाशिवायही होऊ शकतं आणि वेळ जसा जाईल तसा त्रास वाढू शकतो.
3. इतर भागांमध्ये वेदना: छातीतील वेदना कधी कधी डावा हात, पाठीचा भाग, मान किंवा जबड्यात पसरते. हे लोक बहुतेक वेळा स्नायूंचा त्रास किंवा अॅसिडिटी समजून घेतात.
4. असामान्य थकवा किंवा अशक्तपणा: काहीही कारण नसताना सतत थकल्यासारखं वाटणं, कमजोरी येणं आणि त्यामुळे दैनंदिन कामात अडथळा निर्माण होणं हेही हार्टच्या समस्येचं लक्षण असू शकतं.
5. गरगरणे किंवा बेशुद्ध पडण्याची भावना: अचानक गरगरणे, डोकं हलकं वाटणं, आणि त्यासोबत हृदयाची धडधड वेगाने किंवा अनियमित होणं.
6. उलटी किंवा थंड घाम: अचानक उलटी होणे किंवा अंगावर थंड घाम येणे. बरेचदा हे फ्लू किंवा पोटदुखी समजलं जातं, पण हे हार्ट अटॅकचं सुरुवातीचं चिन्ह असू शकतं.
लवकर ओळखणं का महत्त्वाचं आहे?
किशोरवयीन मुलं आणि त्यांचे पालक या लक्षणांकडे कधीकधी गांभीर्याने पाहत नाहीत. 'फक्त थकवा आहे' किंवा 'ताणामुळे असं होतं' असं समजून वेळ घालवला जातो. पण लवकर उपचार न मिळाल्यास हृदयाचं मोठं नुकसान होऊ शकतं किंवा अचानक कार्डियाक अरेस्टही होऊ शकतो.
हेही वाचा: आंघोळ करताना बाथरूममध्ये बेशुद्ध पडली 18 वर्षीय तरुणी; कशीबशी वाचली, तुम्हीही ही चूक करत नाही ना?
मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी टिप्स
संतुलित आहार: जंक फूड, साखरेचं प्रमाण कमी करा, फळं-भाज्या जास्त खा.
नियमित व्यायाम: रोज किमान 30 मिनिटं चालणे, धावणे किंवा खेळ खेळणे.
वाईट सवयींना नकार: धूम्रपान, ड्रग्सपासून दूर राहणं.
ताणतणाव कमी करा: ध्यान, योगासारख्या पद्धतींचा वापर.
नियमित तपासणी: कौटुंबिक इतिहास असल्यास वेळोवेळी हार्ट चेकअप.
जर तुमच्या टीनएजर मुलाला यापैकी कोणतेही लक्षण जाणवत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य वेळी केलेली कृती जीव वाचवू शकते.