Sunday, August 31, 2025 11:15:57 PM

पॅकबंद अन्नावरचे रंगीत कोडे! पॅक केलेल्या अन्नावर असतात 5 रंगांचे चिन्ह; काय आहे याचा अर्थ? जाणून घ्या

हे चिन्ह केवळ डिझाइनचा भाग नाहीत, तर तुमच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाची माहिती देतात. या रंगांचा अर्थ काय आहे? यातील कोणत्या रंगाच्या चिन्हाबाबत तुम्ही विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे? ते जाणून घेऊयात.

पॅकबंद अन्नावरचे रंगीत कोडे पॅक केलेल्या अन्नावर असतात 5 रंगांचे चिन्ह काय आहे याचा अर्थ जाणून घ्या
Food Label Awareness प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

Food Label Awareness: आजकाल बाजारात मिळणाऱ्या जवळपास प्रत्येक अन्नपदार्थाच्या पॅकेटवर एक लहानशा आकारात रंगीत चिन्ह असते. यातील काही चिन्ह हिरवे, लाल, तर काही पिवळ्या, निळ्या किंवा काळ्या रंगाचे असते. बहुतेक वेळा आपण हे चिन्ह दुर्लक्षित करतो, पण तज्ञांच्या मते हे रंग तुमच्या आरोग्याशी थेट संबंधित असतात. हे चिन्ह केवळ डिझाइनचा भाग नाहीत, तर तुमच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाची माहिती देतात. या रंगांचा अर्थ काय आहे? यातील कोणत्या रंगाच्या चिन्हाबाबत तुम्ही विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे? ते जाणून घेऊयात. 

हिरव्या रंगाचे चिन्ह - 

हिरव्या रंगाचे चिन्ह दर्शवते की, संबंधित पॅकेटमधील अन्नपदार्थ पूर्णपणे शाकाहारी आहे. यात कोणताही मांसाहारी घटक, अंडी, मासे किंवा प्राणीजन्य घटक नाही. शुद्ध शाकाहारी लोकांसाठी हे चिन्ह एक महत्त्वाचे मार्गदर्शक आहे.

लाल रंगाचे चिन्ह - 

या चिन्हाचा अर्थ आहे की अन्नात मांस, अंडी किंवा इतर प्राणीजन्य घटक आहेत. शाकाहारी व्यक्तींनी अशा उत्पादनांपासून दूर राहावे.

पिवळ्या रंगाचे चिन्ह - 

यावरून असे दिसून येते की उत्पादनात अंडी आहे. अंड्याचा वापर जरी मांसाहारात न मोडत नसला तरी काही शाकाहारी लोक अंडी टाळतात. त्यांच्या माहितीकरिता हे चिन्ह अत्यंत उपयुक्त ठरते. 

निळ्या रंगाचे चिन्ह - 

यावरून हे उत्पादन औषधाशी संबंधित असल्याचे दिसून येते. याचा अर्थ असा की ते वैद्यकीय स्थितीसाठी वापरले जाऊ शकते. डॉक्टरांचा सल्ला न घेता अशा अन्नाचा वापर करणे टाळावे.

हेही वाचा - Intrahepatic Pregnancy : ही गर्भधारणा असते खूप धोकादायक; आईचं यकृत फुटू शकतं!

काळ्या रंगाचे चिन्ह - 

तथापी, जर अन्नाच्या पॅकेटवर काळे डाग असेल तर ते सूचित करते की त्या उत्पादनात भरपूर रसायने आहेत. हे पदार्थ चव वाढवण्यासाठी, रंग देण्यासाठी किंवा बराच काळ खराब होऊ नये म्हणून वापले जातात. परंतु मोठ्या प्रमाणात ते आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे काळा डाग असलेली उत्पादने शक्यतो टाळा, किंवा फार कमी प्रमाणात वापरा. मुलांना नियमितपणे असे अन्नपदार्थ देणे टाळा. तज्ञांचा असा विश्वास आहे की काळ्या डाग असलेल्या उत्पादनांचे जास्त सेवन पचनसंस्थेवर, यकृतावर आणि मूत्रपिंडांवर परिणाम करू शकते.

हेही वाचा - vitamin B12 Deficiency: शाकाहारी आहात? मग ‘या’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करू नका

अन्नपदार्थ खरेदी करताना घ्या 'ही' काळजी -  

जेव्हा तुम्ही अन्नपदार्थ खरेदी करता तेव्हा पॅकेटवरील रंगीत चिन्ह नक्की तपासा. मुलांच्या स्नॅक्स, नमकीन, मिठाई आणि पॅकेज्ड फूडवर काळ्या रंगाचे चिन्ह आढळते. त्यामुळे असे पदार्थ लहान मुलांना देणे टाळा. अन्नाच्या पाकिटांवरील रंगीत चिन्हांमुळे तुम्हाला तुमच्या आवडी आणि गरजेनुसार योग्य निवड करण्यास मदत होते. त्यामुळे यापुढे बाजारातून पॅकींग पदार्थ घेताना त्यावर कोणते चिन्ह आहे, हे पहा आणि त्यानंतरचं तो पदार्थ विकत घ्या. यामुळे तुमचे आणि तुमच्या परिवाराचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल. 

(Disclaimer: ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा.)
 


सम्बन्धित सामग्री